ना शाहरुख ना सलमान आयपीएलध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' अभिनेत्याला मिळणार 5 कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 16:38 IST2018-03-26T11:08:03+5:302018-03-26T16:38:43+5:30

चित्रपट पद्मावतनंतर अभिनेता रणवीर सिंगच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाली आहे. रणवीरने चित्रपटात साकारलेला अलाउद्दीन खिलजीची भूमिका सगळ्यांच खूप आवडली ...

Shahrukh and Salman will get 5 crores for the actor to perform at the IPL! | ना शाहरुख ना सलमान आयपीएलध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' अभिनेत्याला मिळणार 5 कोटी!

ना शाहरुख ना सलमान आयपीएलध्ये परफॉर्म करण्यासाठी 'या' अभिनेत्याला मिळणार 5 कोटी!

त्रपट पद्मावतनंतर अभिनेता रणवीर सिंगच्या फॅन फॉलोईंगमध्ये वाढ झाली आहे. रणवीरने चित्रपटात साकारलेला अलाउद्दीन खिलजीची भूमिका सगळ्यांच खूप आवडली होती. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार रणवीर सिंग 11 व्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या ओपनिंग सेरिमनीमध्ये परफॉर्म करणार आहे. यासाठी रणवीरने भारी भक्कम रक्कम मोजली आहे. 7 एप्रिल 2018ला होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीरला 15 मिनिट परफॉर्म करण्यासाठी  आयोजक 5 कोटींची रक्कम देणार आहेत. ऐवढी मोठी रक्कम परफॉर्मन्ससाठी मिळणार रणवीर हा पहिला अभिनेता आहे. 

ALSO READ :  शॉकिंग अवस्थेत असलेल्या रणवीर सिंगचा चाहत्याने काढला चक्क व्हिडीओ अन् मग...!

सध्या रणवीर त्याचा आगामी चित्रपट गली बॉयच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘गली बॉय’ मध्ये रणवीरच्या अपोझिट आलिया भट्ट दिसणार आहे. या चित्रपटात आलिया एका तरूण मुस्लिम मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीरचे या चित्रपटातील लूक त्याच्या ‘बँड बाजा बारात’, ‘लेडिज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातील लूकशी बरेच मिळते जुळते आहेत.  यानंतर तो रोहित शेट्टीच्या 'सिम्बा'च्या तयारीला लागणार आहे. ‘सिम्बा’मध्ये रणवीर सिंग संग्राम भालेराव या पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’हा सिनेमा तेलगू चित्रपट ‘टेंपर’चा रिमेक आहे. पण रोहित शेट्टीचे मानाल तर हा पूर्णपणे ‘टेपर’चा रिमेक नसेल. केवळ २० टक्के भाग ‘टेंपर’मधून घेतला जाईल. उर्वरित चित्रपट बॉलिवूड प्रेक्षकांना डोळ्यांपुढे ठेवून बनवला जाईल. गेल्या अनेक दिवसांपासून ‘सिम्बा’साठी हिरोईनचा शोध सुरू  होता. यादरम्यान अनेक अभिनेत्रींच्या नावांची चर्चा झाली. सर्वप्रथम जान्हवी कपूरने ‘सिम्बा’ साईन केल्याची बातमी आली. नंतर इंटरनेट सेन्सेशन व मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर या चित्रपटात दिसणार, अशी चर्चा रंगली. पण आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण आता या चित्रपटात साराची वर्णी लागली आहे.
 गेल्या अनेक दिवसांपासून रणवीरच्या लग्नाची ही चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीपिका आणि रणवीर दोघे ही लग्नाच्या तयारी लागले आहेत. त्यांचे फॅन्स या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असतील यात काही शंका नाही.  

Web Title: Shahrukh and Salman will get 5 crores for the actor to perform at the IPL!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.