Student Of The Year 2 मध्ये शाहीदचा भाऊ इशान??
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 20:07 IST2016-03-19T03:07:44+5:302016-03-18T20:07:44+5:30
आलिया, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन या तिकडीला घेऊन करण जोहरने बनवलेला ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’ हा चित्रपट चांगलाच ...

Student Of The Year 2 मध्ये शाहीदचा भाऊ इशान??
आ िया, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरूण धवन या तिकडीला घेऊन करण जोहरने बनवलेला ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. काही दिवसांपूर्वी खुद्द करणने टिष्ट्वटरवर चॅट करताना ‘स्टुडंट आॅफ दी ईयर’चा पार्ट2 घेऊन येणार असल्याचे जाहिर केले होते. या सिक्वलमध्ये नवे चेहरे दिसणार असल्याची बातमी लगेच मीडियात उमटली होती. आता यापुढची खबर म्हणजे, ‘स्टुडंट आॅफ दी ईयर 2’ साठी एक नवा चेहरा निश्चित झाला आहे. कोण??? अहो, शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर...होय. इशान बॉलिवूडमधील आपल्या पहिल्या डेब्यूसाठी तयार आहे. २० वर्षांचा इशान शाहीदच्या आगामी ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. इशानने ‘स्टुडंट आॅफ दी ईयर 2’साठी आॅडिशन दिली आणि त्याच्या कामाने अनेकांना प्रभावित केल्याची चर्चा आहे. आता, पुढे काय होते, ते बघूया!!!