शाहिद कपूरची चिमुकली मिशा आजीकडून घेत आहे नृत्याचे धडे, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 15:20 IST2017-12-23T09:50:19+5:302017-12-23T15:20:27+5:30

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतची चिमुकली मीशा आपल्या आजीकडूनच नृत्याचे धडे घेत आहे. त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Shahid Kapoor's Chimukli Mishra is taking grandmother's dance lessons, see photo! | शाहिद कपूरची चिमुकली मिशा आजीकडून घेत आहे नृत्याचे धडे, पाहा फोटो!

शाहिद कपूरची चिमुकली मिशा आजीकडून घेत आहे नृत्याचे धडे, पाहा फोटो!

लिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत या दाम्पत्याची चिमुकली मीशा कपूर आतापासून नृत्याचे धडे घेताना दिसत आहे. होय, मीशा चक्क क्लासिकल नृत्य शिकत आहे. विशेष म्हणजे नृत्याचे धडे ती तिच्या आजीकडूनच घेत आहे. मीरा राजपूतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला असून, त्यामध्ये मीशा नृत्याचे धडे घेताना दिसत आहे. आजी करीत असलेल्या नृत्याचे स्टेप ती अतिशय निरखून बघत आहे. 

फोटोमध्ये कथ्थक नृत्यांगना नीलिमा अजीम नृत्य करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे मीशा आपल्या आजीच्या प्रत्येक मूवमेंट्स अतिशय बारकाईने बघत आहे. आजी आणि नातीची ही जुगलबंदी मम्मी मीराने कॅमेºयात कैद केली असून, तिच्या चाहत्यांबरोबर शेअरही केली आहे. या फोटोला कॅप्शन देताना मीराने लिहिले की, ‘गुरू आणि शिष्याची परंपरा’! या फोटोला आतापर्यंत ६७,९२२ लाइक्स मिळाले आहेत. 
 

दरम्यान, शाहिद आणि मीरा सातत्याने आपल्या चिमुकलीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत असतात. मीशाच्या प्रत्येक फोटोला युजर्सकडून पसंत केले जात असल्याने ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत राहणाºया स्टार किड्सपैकी एक बनली आहे. थोडक्यात आपल्या मम्मी-पप्पाप्रमाणेच मीशा लोकप्रिय होताना दिसत आहे. मिशाचा जन्म २६ आॅगस्ट २०१६ रोजी झाला. काही दिवसांपूर्वीच तिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. 

Web Title: Shahid Kapoor's Chimukli Mishra is taking grandmother's dance lessons, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.