Shahid Kapoor : "मी कधीच चांगला बॉयफ्रेंड...", असं का म्हणाला शाहिद? करिनासोबतच्या ब्रेकअपवर पुन्हा बोलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 17:13 IST2023-03-16T16:45:38+5:302023-03-16T17:13:17+5:30
Shahid Kapoor And Kareena Kapoor : शाहिद आणि करीना यांच्या नात्याच्या चर्चा आजही होतात. दोघांनीही एकेकाळी उघडपणे एकमेकांवर प्रेम केलं होतं

Shahid Kapoor : "मी कधीच चांगला बॉयफ्रेंड...", असं का म्हणाला शाहिद? करिनासोबतच्या ब्रेकअपवर पुन्हा बोलला
बॉलिवूडमध्ये नाती बनतात आणि तुटतात हे सामान्य आहे. अनेक सेलिब्रिटी आपलं नातं तुटल्यानंतर कोलमडून जातात. अभिनेता शाहिद कपूरनेही त्याच्या ब्रेकअपचे दुःख अनेकदा व्यक्त केले आहे. खरं तर शाहिद कपूर आणि करीना कपूरच्या अफेअरची खूप जोरदार चर्चा व्हायची. दोघेही नेहमी एकमेकांसोबत स्पॉट झाले होते, पण नंतर असे काही घडले की ही जोडी तुटली. करिनासोबत ब्रेकअप झाल्याचं दु:ख शाहिदने अनेक वेळा व्यक्त केलं आहे.
शाहिद आणि करीना यांच्या नात्याच्या चर्चा आजही होतात. दोघांनीही एकेकाळी उघडपणे एकमेकांवर प्रेम केलं होतं आणि त्यांचे नाते तुटल्याचे दुःख सर्वांनाच झालं. शाहिदने अनेकदा त्याच्या ब्रेकअपमुळे झालेला त्रास सांगितला. अभिनेत्याने सांगितले होते, "मी स्वतःला एक चांगला बॉयफ्रेंड म्हणून दोषी समजतो. मी साडेचार वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो आणि खूप कमिटेड होतो. त्या नात्यातून मला खूप काही शिकायला मिळालं आणि यावरून मी म्हणू शकतो की आता मी कधीही चांगला बॉयफ्रेंड होणार नाही."
शाहिद आणि करीना आता त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. करीना कपूर आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला दोन मुलं असून ते त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. तसेच शाहिद कपूरनेही मीरा राजपूतशी लग्न केलं आहे. शाहिद आणि मीरा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. शाहिद कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच दिग्दर्शक अली अब्बास जफरच्या आगामी एक्शन फिल्म 'ब्लडी डॅडी'मध्ये दिसणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"