शाहिद कपूरने पुन्हा शेअर केला मीशाचा फोटो; इवल्याशा पायांनी लावला लळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 16:04 IST2017-05-20T10:34:20+5:302017-05-20T16:04:38+5:30

​अभिनेता शाहिद कपूर नेहमीच मुलगी मीशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. आतापर्यंत शाहिदने मीशाचे जेवढे फोटोज् शेअर केले आहेत, त्यामध्ये मीशा खूपच क्यूट दिसून आली.

Shahid Kapoor shares photo of Mishish; Ivlyasaa the feet of the face! | शाहिद कपूरने पुन्हा शेअर केला मीशाचा फोटो; इवल्याशा पायांनी लावला लळा!

शाहिद कपूरने पुन्हा शेअर केला मीशाचा फोटो; इवल्याशा पायांनी लावला लळा!

िनेता शाहिद कपूर नेहमीच मुलगी मीशाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. आतापर्यंत शाहिदने मीशाचे जेवढे फोटोज् शेअर केले आहेत, त्यामध्ये मीशा खूपच क्यूट दिसून आली. सुरुवातीला शाहिद मीशाचे फोटो शेअर करण्यास फारसा उत्सुक नसायचा, त्यानंतर मात्र त्याने बरेचसे फोटोज् इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. आता पुन्हा एकदा असाच एक सुंदर फोटो शाहिदने शेअर केले आहे. ज्यामध्ये मीशाचे केवळ पाय दिसत आहेत. मीशाचा हा फोटो खूपच सुंदर असून, तिचे इवलेशे पाय लळा लावणारा आहे. 
 

इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करताना शाहिदने लिहिले की, ‘तुझ्या पायावर तारे... कारण तू ताºयांनी भरलेले आकाश आहेस’ शाहिदने शेअर केलेल्या या फोटोला काही वेळातच चाहत्यांकडून प्रचंड लाइक्स मिळाल्या. शिवाय शाहिद आपल्या लाडकीवर किती प्रेम करतो हेही या फोटोवरून अधोरेखित होते. काही दिवसांपूर्वीच मीशा तिच्या मम्मी-पप्पासोबत पहिल्यांदाच डिनर डेटवर गेली होती. यावेळी मीशाची पूर्ण झलक दिसेल असे बरेचसे फोटोज समोर आले होते. त्या फोटोंमध्येही मीशा खूपच सुंदर दिसत होती. याव्यतिरिक्त शाहिदने ‘मदर्स डे’च्या पार्श्वभूमीवर मीरा आणि मीशाचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये मीराने मीशाला कडेवर घेतलेले होते. 



सध्या शाहिद आपल्या परिवाराला खूप वेळ देताना बघावयास मिळत आहे. त्याच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास सध्या तो ‘पद्मावती’ या चित्रपटाची शूटिंग करीत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भंसाली करीत असून, रिलीज अगोदरच हा चित्रपट वादाच्या भोवºयात सापडला आहे. 

Web Title: Shahid Kapoor shares photo of Mishish; Ivlyasaa the feet of the face!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.