​एक्स गर्लफ्रेन्डला समोर पाहून शाहिद कपूरने केले असे काही की, सगळेच झालेत अवाक् !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 16:39 IST2018-01-02T11:08:22+5:302018-01-02T16:39:03+5:30

एकेकाळी शाहिद कपूर अन् करिना कपूर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप गाजल्या होत्या. पण अचानक काहीतरी बिनसले. यानंतर ...

Shahid Kapoor has seen some excitement in front of X girlfriends, everyone is surprised! | ​एक्स गर्लफ्रेन्डला समोर पाहून शाहिद कपूरने केले असे काही की, सगळेच झालेत अवाक् !

​एक्स गर्लफ्रेन्डला समोर पाहून शाहिद कपूरने केले असे काही की, सगळेच झालेत अवाक् !

ेकाळी शाहिद कपूर अन् करिना कपूर रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप गाजल्या होत्या. पण अचानक काहीतरी बिनसले. यानंतर करिनाने सैफ अली खानला निवडले आणि शाहिदने मीरा राजपूतला. ब्रेकअपनंतर अनेक वर्षे करिना व शाहिद एकमेकांना इग्नोर करताना दिसायचे. पण कदाचित आता तसला संकोच उरलेला नाहीय.अलीकडे एका इव्हेंटमध्ये तरी तसेच चित्र दिसले.
 नुकत्याच एका अवार्ड्स फंक्शनमध्ये शाहिद व करिना एकमेकांसमोर आले. आता दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करून निसटतील असा अंदाज असतानाच झाले भलतेच. एकमेकांना टाळण्याऐवजी करिना व शाहिद दोघांनीही परस्परांना पाहून मस्तपैकी स्माईल दिली. प्रत्यक्षदर्शींचे खरे मानाल तर, ग्लॅमर अ‍ॅण्ड स्टाईल अवार्ड्समध्ये शाहिद कपूर सेलिब्रिटी फोटोग्राफर्सना पोझ देत होता. याचवेळी अचानक करिनाने एन्ट्री घेतली. दोघांनीही एकमेकांना पाहून स्माईल दिली. यानंतर शाहिदने करिनाच्या ड्रेसवर एक फनी कमेंट्सही केली. शाहिदची ती कमेंट्स ऐकून करिना खळखळून हसू लागली. शाहिद व करिना यावेळी कधी नव्हे इतके कम्फर्टेबल दिसले. 

यापूर्वी करिना प्रेग्नंट असताना अशाच एका सोहळ्यात तिचा अन् शाहिदचा आमना-सामना झाला होता. त्याहीवेळी शाहिदने करिनाच्या तब्येतीबद्दल विचारपूस केली होती तर करिनाने शाहिदच्या मुलीबद्दल विचारणा केली होती.

ALSO READ : Shocking! शाहिद कपूरला प्रेमात धोका देणारी ‘ती’ कोण?

२००४ ते २००७ अशी तीन वर्षे करिना आणि शाहिद एकमेकांना डेट करीत होते. त्यांची लव्हस्टोरी अशी काही बहरली होती की, बॉलिवूडमध्ये हे लव्हबर्ड्स सदैव चर्चेत असायचे. पुढे ते विभक्त झाले. गेल्यावर्षी रिलीज झालेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटात शाहिद आणि करिना एकत्र बघावयास मिळाले होते. मात्र यासाठी दोघांनी एकत्र शूटिंग करणे टाळले होते. त्यानंतर करिनाचा पती सैफ अली खानसोबत ‘रंगून’मध्ये  शाहिद दिसला होता. करिनानंतर शाहिदचे नाव त्याच्या अनेक को-स्टार्सशी जुळले. यानंतर अचानक सर्वांना आश्चयार्चा धक्का देत, शाहिदने मीरा राजपूतसोबत लग्न केले. आत्ताचे म्हणाल तर शाहिद मीरासोबत प्रचंड आनंदी आहे. मीरा व शाहिद या दोघांची मीशा नावाची मुलगीही आहे. तिकडे करिनाही सैफ अली खानची बेगम  बनून आपल्या वैवाहिक आयुष्यात खुश आहे. तिलाही तैमूर नावाचा मुलगा आहे. कालच तैमूर एक वषार्चा झाला.

Web Title: Shahid Kapoor has seen some excitement in front of X girlfriends, everyone is surprised!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.