शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 21:33 IST2017-03-16T16:03:24+5:302017-03-16T21:33:24+5:30

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणामुळे वादाच्या भोवºयात सापडलेली मीरा राजपूत हिचा बचाव करण्यासाठी खुद्द पती शाहिद कपूर यानेच ...

Shahid Kapoor defends wife of Meera Rajput; Read, what is the episode? | शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण?

गतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या भाषणामुळे वादाच्या भोवºयात सापडलेली मीरा राजपूत हिचा बचाव करण्यासाठी खुद्द पती शाहिद कपूर यानेच पुढाकार घेतला आहे. शाहिदने म्हटले की, मीराने केवळ मातृत्व आणि नारीवाद  याविषयावर तिचे मत मांडले. यावेळी तिने केलेला ‘पपी’ हा उल्लेख कोणाचेही मन दुखविण्याच्या हेतूने केला नव्हता. तिने केवळ तिचे विचार प्रकट केले. 

जागतिक महिला दिनानिनिमित्त एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या मीराने आपल्या मुलांना घरी सोडून आॅफिसमध्ये जाणाºया महिलांवर टीका करताना म्हटले होते की, ‘मला घरी राहणे पसंत आहे. कारण मला माझ्या मुलीला अधिक वेळ द्यायचा आहे. मी कामामुळे माझ्या मुलीशिवाय एक तासदेखील दूर राहू शकत नाही. ती काही ‘पपी’ नाही, जिच्यासोबत केवळ एक तास वेळ व्यतित करून कामाला अधिक वेळ देऊ. मी तिची आई आहे, माझ्याकडून असे वर्तन होऊच शकणार नाही’ असे विचार मीराने व्यक्त केले होते. 



मीराच्या या स्पष्ट विचारांमुळे नोकरदार महिलांकडून तिच्यावर जोरदार टीका केली गेली. सोशल मीडियावर तर मीराला बºयाच महिलांनी खडेबोल सुनावले. प्रकरण वाढत असतानाच शाहिदने मध्यस्थी करून तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फेमिना ब्यूटी अवॉर्ड्समध्ये शाहिद आला असता त्याने म्हटले की, मीराने जे काही म्हटले त्यामुळे काही महिलांची मने दुखावली गेली; मात्र मला प्रामाणिकपणे सांगावेसे वाटते की, तिचा असा हेतू अजिबातच नव्हता. मीराने व्यक्त केलेले विचार तिचे व्यक्तिगत होते, असे तो म्हणाला. 

 पुढे बोलताना शाहिदने असेही म्हटले की, मुलांचा सांभाळ करायचा की जॉब करायचा हा निर्णय पूर्णत: त्या दाम्पत्याचा असतो. मीरा मिशासाठी जे काही करत आहे, ते खूपच महत्त्वपूर्ण आहे. खरं तर मला मिशासाठी वेळ द्यायला आवडले असते. परंतु आम्हा दोघांपैकी कोणाला तरी काम करावेच लागेल. त्यामुळे मीराच्या विचारांकडे सकारात्मक पद्धतीने बघायला हवे, असेही शाहिद म्हणाला. शाहिद सध्या संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

Web Title: Shahid Kapoor defends wife of Meera Rajput; Read, what is the episode?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.