शाहिद कपूर नृत्यात याला मानतो गुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 16:35 IST2017-12-26T11:05:11+5:302017-12-26T16:35:11+5:30
शाहिद कपूरने गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले ...
.jpg)
शाहिद कपूर नृत्यात याला मानतो गुरू
श हिद कपूरने गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याच्या दिसण्याचे, अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. त्याचसोबत त्याच्या नृत्यावर देखील सगळेच फिदा असतात. शाहिदने त्याच्या नृत्याचे धडे शामक दावरकडेच गिरवले आहेत. शामकच्या इन्स्टिट्यूटमध्ये तो अनेक वर्षं नृत्य शिकत होता. तसेच चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी त्याने शामक दावरच्या टीमसोबत अनेक डान्स शो देखील केले आहेत. शामकमुळेच आपण इतके चांगले नाचू शकतो अशी कबुली अनेकवेळा शाहिदने दिली आहे.
वर्ष अखेर असल्याने सध्या अनेक पुरस्कार सोहळ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत तर सर्वच तारे पुरस्कार सोहळ्याच्या दिमाखदार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आपल्या दमदार परफॉर्मन्ससाठी सर्व कलाकार अगदी मनापासून तालीम करताना दिसतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक कलाकार आपापल्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपल्या चाहत्यांना पुरस्कार सोहळ्याच्या रंगीत तालमीचे अपडेट्स देताना सध्या दिसत आहेत.
![shahid kapoor shiamak davar]()
प्रसिद्ध कोरिओग्राफर शामक दावर अनेक बड्या कलाकारांना एका अवॉर्ड सोहळ्यासाठी तयार करत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा, कतरिना कैफ यांच्यासारखे अनेक बडे कलाकार सध्या त्यांच्या सोशल साईट्सवर शामकसोबतचे फोटोज अपलोड करताना दिसत आहेत. शामकने नृत्याचे शिक्षण दिल्यामुळेच बॉलिवूड विश्वातील अनेक कलाकार डान्स एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या कलाकारांसाठी शामक सोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असतो. नुकतेच सिद्धार्थ, कतरिना, भूमी पेडणेकर हे कलाकार शामकसोबत अवॉर्ड सोहळ्यासाठी तालीम करताना दिसले. त्या सगळ्यांनीच पुरस्कार सोहळ्याची तालीम खूपच एन्जॉय केल्याचे त्यांच्या सोशल नेटवर्किंग साइटवरून आपल्याला दिसून येत आहे.
सिद्धार्थ, कतरिना, भूमी पेडणेकरसोबत शाहिद देखील पुरस्कार सोहळ्यात परफॉर्मन्स सादर करणार आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या तालमीदरम्यान अभिनेता शाहिद कपूर आणि कोरिओग्राफर मर्जी यांच्यामध्ये स्टेजवरच डान्स बॅटल रंगले होते आणि यामध्ये शाहिदने बाजी मारली. या डान्स बॅटलचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तालमीच्या दरम्यान खूप चांगले नृत्य सादर करून शाहिद शामकचा खूप चांगला शिष्य असल्याचे त्याने सिद्ध केले आहे.
Also Read : शाहिद कपूरला प्रेमात धोका देणारी ‘ती’ कोण?