शाहिदला कशाची वाटतेय भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 14:42 IST2016-11-06T14:42:53+5:302016-11-06T14:42:53+5:30
मुलीचा वडील होणं काही सोपी बाब नाही. मुलगी झाल्यानंतर मन खुप हळवं होतं..एक हुरहूर, चिंता, काळजी तिच्या वडिलांना लागून ...

शाहिदला कशाची वाटतेय भीती?
म लीचा वडील होणं काही सोपी बाब नाही. मुलगी झाल्यानंतर मन खुप हळवं होतं..एक हुरहूर, चिंता, काळजी तिच्या वडिलांना लागून राहते. पण हे देखील तितकंच खरंय की तिला सुखी भविष्य, योग्य करिअर मिळावं यासाठी तिचे वडील प्रयत्न करतात. आता अशीच हुरहूर, काळजी, भीती शाहिदला सतावू लागलीय म्हणे.
एका चॅट शोमध्ये बोलताना शाहिदला विचारण्यात आले की, मिशाला जर अभिनेत्री व्हावं वाटलं तर? त्यावर चिंतित होऊन शाहिद म्हणाला,‘ खरंतर हे खुप कठीण काम आहे. प्रचंड कष्ट आणि मेहनत या क्षेत्रात घ्यावी लागते. कुठलंही क्षेत्र सहज सोप्पं कधीच नसतं. पण तरीही तिने येऊन जर मला तिने तिची अभिनेत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली तर...? याची मला भीती वाटते आहे.’
शाहिद त्याच्या स्वत:च्या वडिलांबद्दल बोलताना म्हणाला,‘ ते एक वडील होण्याअगोदर एक उत्तम व्यक्ती आहेत. माझ्यासोबत त्यांचं वडिलांचं नातं नंतर मित्राचं अगोदर आहे. या गोष्टी मला त्यांच्याकडून शिकायच्या आहेत. पण ते खुप जास्त शीघ्रकोपी आणि जास्त काळजी घेणारे आहेत. त्यामुळे या दोन बाबी मला माझ्या मुलीला द्यायच्या नाहीत.’
![shahid kapoor]()