शाहरूख खानने पाळला शब्द; ‘सेजल’ला भेटण्यासाठी अहमदाबादला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2017 20:10 IST2017-06-21T14:40:35+5:302017-06-21T20:10:35+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याच्या टीमने दिलेला शब्द पाळला असून, तो सेजलला भेटण्यासाठी अहमदाबादला रवाना झाला आहे. काही ...

Shah Rukh Khan's words; To visit 'Sejal' to Ahmedabad! | शाहरूख खानने पाळला शब्द; ‘सेजल’ला भेटण्यासाठी अहमदाबादला रवाना!

शाहरूख खानने पाळला शब्द; ‘सेजल’ला भेटण्यासाठी अहमदाबादला रवाना!

लिवूडचा किंग शाहरूख खान आणि त्याच्या टीमने दिलेला शब्द पाळला असून, तो सेजलला भेटण्यासाठी अहमदाबादला रवाना झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘जब हॅरी मेट सेजल’च्या निर्मात्यांनी चाहत्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यानुसार ज्या शहरात सर्वाधिक ‘सेजल’ नावाच्या मुली आहेत, त्या सर्व मुलींना शाहरूख त्याच्या टीमसोबत भेटायला पोहोचणार आहे. आता ‘सेजल’ नावाच्या मुली अहमदाबाद शहरात असल्याचे समोर आल्याने, शाहरूख दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्यासोबत अहमदाबादला रवाना झाला आहे. याठिकाणी तो त्याच्या चित्रपटातील ‘राधा’ हे गाणे रिलीज करणार आहे. 

शाहरूखने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हटके फंडा राबविताना या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा फॉर्म्युला वापरला. त्याचबरोबर तो या चित्रपटाशी संबंधित छोटे-छोटे व्हिडीओज् सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवित आहे. चित्रपट भाषेत यास मिनी ट्रेलर असे संबोधले जाते. आतापर्यंत या चित्रपटाचे तब्बल चार व्हिडीओ रिलीज करण्यात आले आहेत. असेच काहीसे प्रमोशन अभिनेता आयुष्यमान खुराणा आणि परिणिती चोपडा यांनी त्यांच्या ‘मेरी प्यारी बिंदू’ या चित्रपटाप्रसंगी केले होते. या चित्रपटाचे तब्बल पाच व्हिडीओ रिलीज करण्यात आले होते. 

दरम्यान, या चित्रपटात शाहरूख खान व्यतिरिक्त अभिनेत्री अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटात शाहरूख एका पंजाबी तरुणाच्या भूमिकेत बघावयास मिळणार असून, अनुष्का गुजराती मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनुष्का विदेशात फिरायला जात असते, त्यावेळी शाहरूख तिचा गाइड म्हणून तिला मदत करतो. याचदरम्यान दोघांमध्ये प्रेम होते. पुढे काय होईल याचा कदाचित तुम्हाला अंदाज आलाच असेल. चित्रपटाच्या कथेविषयी बोलायचे झाल्यास चित्रपट बºयापैकी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाच्या कथेशी साम्य साधणारा आहे. असा अंदाज समीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Shah Rukh Khan's words; To visit 'Sejal' to Ahmedabad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.