शाहरुखच्या फॅनचे ‘जबरा’ सात भाषेत रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 05:11 IST2016-02-23T11:29:25+5:302016-02-23T05:11:42+5:30

अवधुत गुप्तेची स्वप्नपूर्ती 

Shah Rukh Khan's 'Jabera' release in seven languages | शाहरुखच्या फॅनचे ‘जबरा’ सात भाषेत रिलीज

शाहरुखच्या फॅनचे ‘जबरा’ सात भाषेत रिलीज

ong>बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या चाहत्यांना त्याच्या नव्या ‘फॅन’ लूकची उत्सुकता लागली आहे. फॅन या चित्रपटाबाबत कमालीची गोपनियता राखण्यात येत असली तरी या चित्रपटाबाबतचे काही फ ोटो  सोशल मीडियावर लिक झाल्यावर चांगलेच व्हायरल झाले होते. 



आता फॅन चित्रपटाचे गाणे ‘जबरा फॅन’ जबरदस्त हिट ठरले आहे. सुमारे 80 लाख वेळा हे गाणे पाहण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याचमुळे यशराज फिल्मसने हे गाणे तब्बल सात भाषांत तयार केले आहे. यात हिंदीचाही सामवेश आहेच. शाहरुखच्या चाहत्यांसाठी तमिळ, बंगाली, गुजराती, भोजपुरी, पंजाबी, आणि मराठी भाषेत ‘जबरा फॅन’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

यशराज निर्मित व मनीष शर्मा दिग्दर्शित फॅन हा चित्रपट 15 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाचा आॅफिशिअल ट्रेलर 29 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. यात  फिल्मस्टार आर्यन खन्ना व त्याचा फॅन गौरव छनाना या दोन्ही भूमिका शाहरुख खानने साकरल्या आहेत. 

मराठीत जबरा फॅन हे गाणे अवधुत गुप्तेने गायले आहे. काही दिवसांआधी अवधुतने शाहरुखसाठी गायचे आहे असे सांगितले होते. आता त्याचे स्वप्न पूर्ण झाले असेच म्हणावे लागेल. अवधुतचा आवाज शाहरुखला मॅच करतो असेच हे गाणे पाहिल्यावर दिसते.....



विशाल-शेखर यांनी फॅनला संगीत दिले असून हिंदीमध्ये जबरा फॅन हे गाणे गायक नक्श अझिज याने गायले आहे. पंजाबी भाषेत हरभजन मान ‘घैंत फॅ न’ गातोय, बंगाली भाषेत ‘पिकू’ फेम अनुपम रॉय ‘ब्यापोक फॅन’, गुजरातीमध्ये ‘जबरो फॅन’ हे गीत अरविंद वेगडा गाताना दिसतो, तामिंळ भाषेत ‘तक्कार्रा फॅन’ नक्श अझिजने, भोजपुरीमध्ये मनोज तिवारी यांनी ‘जबरदस्त फॅन’ गीत गायले आहे. 
 

Web Title: Shah Rukh Khan's 'Jabera' release in seven languages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.