​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ इतके रुपये... अशा प्रकारे खर्च केली होती त्याने पहिली कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 15:22 IST2018-04-23T09:52:22+5:302018-04-23T15:22:22+5:30

शाहरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या ...

Shah Rukh Khan's first earning was only that much ... he had spent so much money that he had earned his first earnings | ​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ इतके रुपये... अशा प्रकारे खर्च केली होती त्याने पहिली कमाई

​शाहरुख खानची पहिली कमाई होती केवळ इतके रुपये... अशा प्रकारे खर्च केली होती त्याने पहिली कमाई

हरुख खानने बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडचा बादशहा अशी त्याची ओळख आहे. मोठ्या पडद्याप्रमाणे त्याने छोट्या पडद्यावर देखील त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. शाहरुख खानने आजवर प्रचंड मेहनत केल्यामुळेच त्याला यश मिळवता आले आहे. त्यामुळे त्याचे जीवन हे लोकांसाठी प्रेरणादायी आहे. शाहरुख हा अत्यंत सामान्य कुटुंबातील आहे. त्याने फौजी या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर सर्कस या मालिकेत देखील प्रेक्षकांना त्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. मालिकांमध्ये भूमिका साकारणारा कलाकार आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. शाहरुखच्या छोट्या पडद्यावरील भूमिका आवडल्यानेच त्याला दिल आशिया है, दिवाना यांसारख्या चित्रपटात काम करायला मिळाले. या चित्रपटांनंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. शाहरुख आपले व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात नेहमीच ताळमेळ घालतो. तो एक सर्वोत्तम अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला पती, वडील आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शाहरुखने आज मिळवलेले हे यश खरेच वाखण्याजागे आहे. शाहरुखने आजवर दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुछ होता है, डर, अंजाम, चक दे, स्वदेश, कभी खुशी कभी गम यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील सगळ्यात चांगल्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. आज शाहरुखचे मानधन हे करोडोमध्ये आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, शाहरुखची पहिली कमाई ही केवळ काही रूपये होती.
शाहरुख एका थिएटरमध्ये तिकिट काऊंटरवर काम करत असे. ही शाहरुखची आयुष्यातील पहिली नोकरी होती. त्याने त्याच्या आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा ५० रुपये कमावले होते. अनेकवेळा लोक आपल्या पहिल्या कमाईतून स्वतःसाठी काहीतरी वस्तू घेतात अथवा पहिल्या कमाईतून आईला, वडिलांना, भावांना, बहिणीला अथवा प्रेयसीला काहीतरी घेतात. पण शाहरुख खानने त्याची पहिली कमाई कशी खर्च केली होती, हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. शाहरुखने त्याच्या पहिल्या कमाईतून आलेल्या पैशातून एका ठिकाणाला भेट दिली होती. शाहरुख हा मुळचा दिल्लीचा आहे. दिल्लीजवळ असलेला ताजमहाल पाहाण्याची त्याची अनेक वर्षं इच्छा होती. त्यामुळे शाहरुख त्याच्या पहिल्या कमाईतून खास आग्र्याला ताजमहाल पाहायला गेला होता. 

Also Read : धोनीच्या मुलीसोबत जमली शाहरुख खानची गट्टी; पाहा दोघांमधील धमालमस्तीचे फोटो!

Web Title: Shah Rukh Khan's first earning was only that much ... he had spent so much money that he had earned his first earnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.