नाइट क्लबमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये अशा अंदाजात दिसली शाहरूख खानची परी सुहाना खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 16:02 IST2017-12-23T10:32:04+5:302017-12-23T16:02:54+5:30

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खरं तर ...

Shah Rukh Khan's fairy Suhana Khan appeared in the black outfit in the nightclub! | नाइट क्लबमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये अशा अंदाजात दिसली शाहरूख खानची परी सुहाना खान!

नाइट क्लबमध्ये ब्लॅक आउटफिटमध्ये अशा अंदाजात दिसली शाहरूख खानची परी सुहाना खान!

लिवूडचा किंग शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. खरं तर सुहानाचे फोटो नियमितपणे सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. एवढेच नव्हे तर ड्रेसिंग सेन्सने शाहरूखची परी आपल्या जनरेशनला इन्स्पायरही करीत असते. त्यामुळेच सुहानाच्या फॅन फॉलोइंगमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. बºयाचशा फोटोमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसणारी सुहाना गेल्या काही दिवसांपासून एका वेगळ्याच अंदाजात बघावयास मिळत आहे. कधी पप्पा शाहरूखसोबत, तर कधी मम्मी गौरी खानसोबत तिचे स्टनिंग फोटो चाहत्यांना आकर्षित करीत आहेत.  यावेळेस १७ वर्षांची सुहाना दिल्ली येथील Cirque Le Soir मध्ये मम्मी गौरी खानसोबत बघावयास मिळाली. 





ब्लॅक आउटफिटमध्ये सुहाना खूपच स्टनिंग दिसत होती. सुहानाची या नाइट क्लब इव्हेंटमध्ये एंट्री होताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. मम्मी गौरीसोबत ती या इव्हेंटमध्ये आली होती. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, याअगोदर सुहाना तेव्हा चर्चेत आली जेव्हा मम्मी गौरीने सुहानाचा स्वीमिंग सुटमधील एक फोटो शेअर केला होता. सुहानाचा हा फोटो सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये सुहाना स्विमिंग पूलमध्ये दिसत होती. काही फोटोंमुळे सुहाना वादाच्या भोवºयातही सापडली आहे. जेव्हा तिचा भाऊ अबरामसोबतचा एक स्विमसूटमधील फोटो पोस्ट केला गेला होता, तेव्हा यूजर्सनी त्यास उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या होत्या. ज्यामुळे शाहरूख चांगलाच भडकला होता. 





तसेच सुहाना तिच्या महागड्या ड्रेसवरूनही चर्चेत आली होती, तर तिची एक झलक टिपण्यासाठी फोटोग्राफर्सनी तिचा पाठलाग केल्यामुळेदेखील सुहाना लाइमलाइटमध्ये होती. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने सुहाना चर्चेत राहत आहे, त्यावरून ती लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार असल्याची चर्चा आहे. मात्र जोपर्यंत याविषयी अधिकृत घोषणा केली जात नाही, तोपर्यंत या केवळ चर्चा ठरणार आहेत. दरम्यान, शाहरूखने या अगोदरच स्पष्ट केले आहे की, सुहानाने तिच्या शिक्षणावर अगोदर भर द्यावा. त्यानंतरच बॉलिवूडमध्ये येण्याविषयी विचार करावा. 

Web Title: Shah Rukh Khan's fairy Suhana Khan appeared in the black outfit in the nightclub!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.