जगातील धनाढ्य अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चौथा; अमिताभ, सलमान कितवे ते पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 11:21 AM2023-06-15T11:21:22+5:302023-06-15T11:28:03+5:30

संपत्तीच्या बाबतीत किंगखानने टॉम क्रूझलाही मागे टाकलं आहे.

Shah Rukh Khan world fourth richest actor; Amitabh and Salman also have in this list | जगातील धनाढ्य अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चौथा; अमिताभ, सलमान कितवे ते पाहा

जगातील धनाढ्य अभिनेत्यांमध्ये शाहरुख खान चौथा; अमिताभ, सलमान कितवे ते पाहा

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांचं जगणं, जीवनशैली आलिशान असते हे साऱ्यांना माहिती आहे.  सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. आपल्या अभिनयाने शाहरुखने रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलं आहे. शाहरुख खान जगातील चौथ्या क्रमांकाचा श्रीमंत अभिनेता आहे. टॉम क्रूझला मागे टाकत त्यानं हे स्थान मिळवले आहे. आता त्याच्या पुढे बेन जॉन्सन, टायलर पेरी आणि जेरी सेनफेल्ड आहेत.

शाहरुख खानची एकूण संपत्ती 770 दशलक्ष डॉलर आहे. टॉम क्रूझची एकूण संपत्ती 620 दशलक्ष डॉलर आहे. सहाव्या क्रमांकावर जॅकी चॅन आहे, ज्यांची एकूण संपत्ती 520 दशलक्ष डॉलर इतकी आहे. जॉर्ज क्लूनी 500 दशलक्ष संपत्तीसह सातव्या क्रमांकावर आहे. 

पहिल्या पाच श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत शाहरुख खानचा समावेश आहे. शाहरुख खानची एकूण संपत्ती 700 दशलक्ष डॉलर आहे, जी भारतीय मूल्यानुसार 6289 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तर या यादित 410 दशलक्ष डॉलरसह अमिताभ बच्चन १३ व्या स्थानावर आहेत. तर 350 दशलक्ष डॉलरसह सलमान खान १५ व्या स्थानवर आहे. 
 

Web Title: Shah Rukh Khan world fourth richest actor; Amitabh and Salman also have in this list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.