शाहरुख खान पहिल्यांदाच शेअर करणार लेक सुहाना खानसोबत स्क्रीन, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 05:09 PM2023-11-22T17:09:16+5:302023-11-22T17:10:35+5:30

Shah Rukh Khan And Suhana Khan : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे आणि तिचा चित्रपट डिसेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान बाप-लेकीची जोडी एका चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Shah Rukh Khan will share screen with daughter Suhana Khan for the first time, shooting will start soon | शाहरुख खान पहिल्यांदाच शेअर करणार लेक सुहाना खानसोबत स्क्रीन, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

शाहरुख खान पहिल्यांदाच शेअर करणार लेक सुहाना खानसोबत स्क्रीन, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan)ला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. शाहरुख खान लवकरच 'डंकी' (Dunki) चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.  दरम्यान आता वृत्त समोर आले आहे की, शाहरुख खान त्याची मुलगी सुहाना खान(Suhana Khan)सोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लेटेस्ट मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खानचा चित्रपट एक अॅक्शन-थ्रिलर असेल आणि त्याचे शूटिंग जानेवारीमध्ये सुरू होईल आणि त्याचे प्री-प्रॉडक्शन काम पूर्ण झाले आहे. शाहरुख खानची मुलगी सुहाना खान 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे आणि तिचा चित्रपट डिसेंबरमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'पिंकविला'च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खान एकत्र 'किंग' या चित्रपटात झळकणार आहे.  हा अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी २०२४ मध्ये सुरू होणार असून त्याचे प्री-प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे. शाहरुख खान आणि सुहाना खानच्या 'किंग' चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करणार आहे. चित्रपटाचे मूळ कथानक भावनिक आहे आणि त्यात अनेक ट्विस्ट आणि टर्न येणार आहेत. हा चित्रपट शाहरुख खानचे प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज आणि सिद्धार्थ आनंदचे प्रोडक्शन हाऊस मारफ्लिक्स एंटरटेनमेंट यांनी बनवला आहे.

वर्कफ्रंटबद्दल...

शाहरुख खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर तो 'डंकी' या चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान २०२३ साल खास ठरलं आहे. कारण या वर्षी तो 'पठाण' आणि 'जवान' या दोन चित्रपटांमध्ये दिसला आहे, जे बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरले आहेत. दरम्यान, सुहाना खान दिग्दर्शिका झोया अख्तरच्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुहाना खानसोबतच अमिताभ बच्चन यांचा नात अगस्त्य नंदा आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर देखील या चित्रपटातून पदार्पण करणार आहेत. 'द आर्चीज' हा चित्रपट डिसेंबरमध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Shah Rukh Khan will share screen with daughter Suhana Khan for the first time, shooting will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.