१४ वर्षांनी पुन्हा शाहरुख-प्रियंका एकत्र? 'या' चित्रपटात दिसू शकतो रोमा आणि डॉनचा रोमान्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:40 IST2025-07-10T16:40:24+5:302025-07-10T16:40:40+5:30
'किंग खान' आणि 'देसी गर्ल'ची जोडी परतणार?

१४ वर्षांनी पुन्हा शाहरुख-प्रियंका एकत्र? 'या' चित्रपटात दिसू शकतो रोमा आणि डॉनचा रोमान्स!
Shah Rukh Khan To Reunite With Priyanka: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) यांच्या जोडीचा एक मोठा चाहतावर्ग आहे. शाहरुख आणि प्रियंका फार वेळा एकत्र झळकले नाहीत. पण, जेव्हा कधी दिसले, तेव्हा प्रेक्षकांच्या मनात घर केलं. २००६ मध्ये आलेल्या 'डॉन' चित्रपटात डॉन आणि रोमा यांची जोडी पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या 'डॉन २' मध्ये दोघांचं अॅक्शन आणि रोमान्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं होतं. यावेळी त्याचं अफेअर असल्याच्या चर्चाही तेजीत होत्या. 'डॉन २'नंतर या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. पण, त्यानंतर दोघेही कधीही एकत्र दिसले नाहीत. आता शाहरुख आणि प्रियंकाला पुन्हा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा अखेर पूर्ण होऊ शकते.
दिग्दर्शक फरहान अख्तर याने 'डॉन ३' साठी शाहरुख खानला कॅमिओ करण्यासाठी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने ही ऑफर स्वीकारली असून तो 'डॉन ३' मध्ये एका खास भूमिकेत झळकू शकतो. तसेच, बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका चोप्रासुद्धा 'डॉन ३' मध्ये तिच्या रोमा या भूमिकेत पुनरागमन करू शकते. ती पूर्ण रोलमध्ये असेल की कॅमिओमध्ये हे अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप निर्मात्यांकडून देण्यात आलेली नाही. पण, तसे झाल्यास १४ वर्षांनी पुन्हा शाहरुख-प्रियंका एकत्र पाहता येईल. पण, अनेक वर्षांनी शाहरुख आणि प्रियंका एकाच सिनेमात झळकणार असले, तरी त्यांचा एकत्र सीन असेल की नाही, याबाबतही स्पष्ट माहिती समोर नाही.
दरम्यान, गेल्या वर्षी अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने 'डॉन-३' मध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असल्याची घोषणा केली होती. तेव्हा त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता, कारण लोकांना या भूमिकेत शाहरुख खान पहायचं होतं. रिपोर्ट्सनुसार, 'डॉन ३' चे शूटिंग जानेवारी २०२६ मध्ये सुरू होणार असून हा चित्रपट वर्षाअखेरीस थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अभिनेत्री कृती सेनन हिचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका असण्याची चर्चा आहे.