शाहरूख खान म्हणतोय, मुंबईने आयुष्य घडविले!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2017 21:13 IST2017-03-31T15:43:41+5:302017-03-31T21:13:41+5:30

शाहरूख खान म्हणतोय, मुंबईने आयुष्य घडविले!!
मायानगरी म्हणून उल्लेख केला जात असलेल्या मुंबईनगरीची अनेकांना भुरळ आहे. मग तो सर्वसामान्य असो वा एखादा सुपरस्टार. ज्याला मुंबईची हवा लागली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. आता हेच बघा ना, मुंबईत तब्बल २५ वर्ष पूर्ण करणाºया सुपरस्टार शाहरूख खानने जुन्या आठवणी ताज्या करताना या शहराने माझे आयुष्यच बदलून टाकल्याचे म्हटले. यावेळी शाहरूख भावुक झाल्याचे दिसून आले.
वास्तविक शाहरूख नेहमीच स्वत:च्या हिमतीवर स्वत:ला सिद्ध करीत आलेला आहे. कुठल्याही प्रकारचा गॉडफादर नसताना त्याने मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चा लौकिक निर्माण केला आहे. या संघर्षादरम्यान त्याला अनेक ठिकाणं बदलावी लागली. मूळचा दिल्ली येथील रहिवासी असलेल्या शाहरूखने बॉलिवूडमध्ये नशीब आजमाविण्यासाठी २५ वर्षांपूर्वी मुंबईत पाऊल ठेवले. अन् शहराने त्याला एवढे काही भरभरून दिले की, आज तो इंडस्ट्रीमध्ये ‘किंग’ नावाने ओळखला जातो. याचाच आनंद व्यक्त करताना शाहरूखने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्याने लिहिले की, ‘मुंबईत २५ वर्ष पूर्ण झाले. या शहराने मला जगण्याची प्रेरणा दिली. आरसी (प्रॉडक्शन बॅनर रेड चिलीज एंटरटेनमेंट) वीएफएक्स न्यू आॅफिसच्या उद्घाटनादरम्यान पहिल्यांदाच जाणीव झाली की, मी योग्य निर्णय घेतला. मूळचा दिल्लीचा असलेल्या ५१ वर्षीय शाहरूखने १९८० मध्ये ‘फौजी’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली; मात्र त्याने १९९२ मध्ये ‘दिवाना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खºया अर्थाने पाऊल ठेवले. त्यानंतर ‘बाजीगर’मधील त्याच्या अभिनयाने इतिहासच रचला.
पुढे शाहरूखने ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘कुछ कुछ होता है’, ‘येस बॉस’, ‘देवदास’, ‘कल हो ना हो’, ‘चक दे इंडिया’, ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘डिअर जिंदगी’ यासारखे कित्येक सुपरहिट चित्रपट दिले. सद्यस्थितीत बॉलिवूडमध्ये शाहरूख हा जबरदस्त दबदबा असलेला अभिनेता आहे. सध्या तो इम्तियाज अली यांच्या ‘द रिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत आहे.

25 yrs in Mumbai, which has given me my life. For the 1st time at the opening of RC vfx new office I felt, I must have done something rite.
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 30, 2017 ">http://}}}}25 yrs in Mumbai, which has given me my life. For the 1st time at the opening of RC vfx new office I felt, I must have done something rite.
— Shah Rukh Khan (@iamsrk) March 30, 2017