अंबानींच्या लग्नात नाचण्यासाठी तीनही खानला मिळालं तगडं मानधन? जाणून घ्या किती मिळाली रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 12:07 PM2024-03-07T12:07:47+5:302024-03-07T12:08:51+5:30

Bollywood star: अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग निमित्त पहिल्यांदाच बॉलिवू़डचे तीन खान मंचावर एकत्र आले.

shah-rukh-khan-salman-khan-aamir-khan-did-not-charge-for-anant-ambani pre-wedding | अंबानींच्या लग्नात नाचण्यासाठी तीनही खानला मिळालं तगडं मानधन? जाणून घ्या किती मिळाली रक्कम

अंबानींच्या लग्नात नाचण्यासाठी तीनही खानला मिळालं तगडं मानधन? जाणून घ्या किती मिळाली रक्कम

सध्या मुकेश अंबानी (mukesh ambani)यांच्या घरी लग्नाची धामधूम सुरु आहे. लवकरच त्यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट ही जोडी लग्नगाठ बांधणार आहे. त्यापूर्वी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं प्री-वेडिंग फंक्शन पार पडत आहे. १ ते ३ या काळात झालेल्या त्यांच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. इतकंच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सही या सोहळ्यात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सलमान (salman khan), आमिर (aamir khan) आणि शाहरुख (shahrukh khan) यांनी पहिल्यांदाच एकत्र परफॉर्म केला. मात्र, या परफॉर्मन्ससाठी या तीनही खानने तगडं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे.

अनंत आणि राधिका यांच्या प्री वेडिंग निमित्त पहिल्यांदाच बॉलिवू़डचे तीन खान मंचावर एकत्र आले. यावेळी या तिघांनीही RRR या सुपरहिट सिनेमातील 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स केला. या डान्सची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली आहे. यामध्येच या डान्ससाठी सलमान, आमिर आणि शाहरुखने प्रचंड मोठं मानधन घेतल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे अंबानींनी या तीनही खानला किती मानधन दिले ते पाहुयात.

अंबानींनी किती दिलं मानधन?

‘टाइम्स नाउ’च्या वृत्तानुसार, शाहरुख, सलमान आणि आमिरला एकत्र आणण्याचा निर्णय अंबानींनी अचानक घेतला. विशेष म्हणजे या तिघांनीही होकार दिला. या तिघांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण यांच्यासोबत नाटू नाटूवर डान्स केला. विशेष म्हणजे या डान्स परफॉर्मन्ससाठी रामचरणसह तीनही खानने एकही रुपया मानधन घेतलं नाही.

Web Title: shah-rukh-khan-salman-khan-aamir-khan-did-not-charge-for-anant-ambani pre-wedding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.