आता कोटीत कमावणाऱ्या शाहरुखचा 'एवढा' होता पहिला पगार, पैसे हातात येताच केलं होतं हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 04:26 PM2023-10-04T16:26:02+5:302023-10-04T16:29:49+5:30

तुम्हाला माहित आहे का, शाहरुख खानचा पहिला पगार किती होता.

Shah Rukh Khan earned his first pay cheque of Rs 50 | आता कोटीत कमावणाऱ्या शाहरुखचा 'एवढा' होता पहिला पगार, पैसे हातात येताच केलं होतं हे काम

Shah Rukh Khan

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान त्याच्या प्रत्येक चित्रपटामुळे चर्चेत असतो. त्याच्या शेवटच्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम मोडलेत. 'पठाण' आणि 'जवान' चित्रपटांनी अप्रतिम कलेक्शन केलं. ‘जवान’ या चित्रपटानं तर जगभरात खळबळ उडवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘जवान’च्या प्रचंड यशानं बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड पुन्हा नव्यानं लिहिले गेले आहेत. आज शाहरुख खान कोटींमध्ये कमावतो, तो प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये घेतो, पण तुम्हाला माहित आहे का शाहरुख खानचा पहिला पगार किती होता आणि त्याने पहिला पगार हातात येताच काय केले होते.

देशात आणि जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा सुपरस्टार शाहरुख खानचा संघर्ष हा हृदय पिळवटून टाकणारा आहे.  अनेकवेळा मुलाखतींमध्ये शाहरुखने स्वत:च्या संघर्षावर भाष्य केलं.  एका मुलाखतीत किंग खानने पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला होता. जेव्हा त्याने काम करायला सुरुवात केली, तेव्हा त्याला पहिल्यांदा फक्त 50 रुपये पगार मिळाला होता, असे त्याने सांगितले होते. 

 पहिला पगार हातात येताच शाहरुख थेट आग्रा येथे पोहचला होता. शाहरुख हा मुळचा दिल्लीचा आहे. दिल्लीजवळ असलेला ताजमहाल पाहाण्याची त्याची अनेक वर्षं इच्छा होती. त्यामुळे शाहरुखने पहिल्या कमाईतून ताजमहाल पाहिला होता. 

शाहरुख खानने मुलाखतीत सांगितले होते की,  'ताजमहलचे तिकीट काढल्यानंतर माझ्याकडे फक्त लस्सी घेण्यासाठी पैसे शिल्लक राहिले. मग मी लस्सी खरेदी केली. पण, तेवढ्यात त्यात माशी पडली. मग मी ती माशी बाहेर काढून फेकली आणि आणि लस्सी प्यायली. पण, त्यानंतर मला संपुर्ण प्रवासात उलट्या झाल्या होत्या'. 

शाहरुखच्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून झाली होती. मालिकांमध्ये भूमिका साकारणारा कलाकार आज बॉलिवूडवर राज्य करतोय. प्रचंड मेहनत करुन त्याने हे यश मिळवलं आहे.  शाहरुख आपले व्यवसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात नेहमीच ताळमेळ घालतो. तो एक सर्वोत्तम अभिनेता असण्यासोबतच खूप चांगला पती, वडील आहे. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शाहरुखने आज मिळवलेले हे यश खरेच वाखण्याजागे आहे. 

Web Title: Shah Rukh Khan earned his first pay cheque of Rs 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.