‘कसौटी जिंदगी की2’च्या मेकर्सला भारी पडली शाहरूख खानसोबतची डील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2018 20:39 IST2018-08-27T20:34:44+5:302018-08-27T20:39:48+5:30
‘टीव्ही क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की2’ची सध्या जोरदार चर्चा आहे. सध्या या शोचा प्रमोशनल व्हिडिओ शूट केला जात आहे. याचदरम्यान एक मोठी खबर समोर येतेय.

‘कसौटी जिंदगी की2’च्या मेकर्सला भारी पडली शाहरूख खानसोबतची डील!
‘टीव्ही क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की2’ची सध्या जोरदार चर्चा आहे. अलीकडे या सीरिअलचे प्रोमो रिलीज झालेत. सध्या या शोचा प्रमोशनल व्हिडिओ शूट केला जात आहे. याचदरम्यान एक मोठी खबर समोर येतेय. होय, खबर खरी मानाल तर शाहरूख खानने या शोच्या प्रमोशनसाठी इतके रूपये घेतले की शो मेकर्सलाही घाम सुटला. होय, शाहरूखसोबत चॅनल आधी एक प्रमोशनल व्हिडिओ शूट करू इच्छित होता. पण यानंतर आणखी तीन व्हिडिओ शूट केले गेलेत. हे प्रमोशनल व्हिडिओ लवकरच रिलीज केले जाणार आहे. यापैकी एका व्हिडिओ शाहरूखसोबत एकता कपूरही दिसणार आहे. या व्हिडिओसाठी चॅनलला शाहरूखला तब्बल ८ कोटी रूपये मोजल्याचे कळतेय. होय, एकतासोबतच्या व्हिडिओसाठी शाहरूखने ५ कोटी घेतले आणि उर्वरित तीन व्हिडिओसाठी प्रत्येकी १ कोटी रूपये चार्ज केलेत. या चार व्हिडिओव्यतिरिक्त शाहरूख खान 'कसौटी जिंदगी की2' मालिकेत नरेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. किंग खान प्रेक्षकांना या मालिकेतील मुख्य कलाकार अनुराग व प्रेरणा यांची ओळख करून देणार आहे.
एकता कपूरसोबतचा व्हिडिओ शूट करायला शाहरूखला ५ ते ६ तास द्यावे लागले होते. तर उर्वरित नरेटिव्ह व्हिडिओसाठी शाहरूखने २ ते ३ तास काम केले. याचा ठोबळ हिशेब मांडला तर त्याने एकूण ७२० मिनिटे काम केले आणि यातील प्रत्येक मिनिटासाठी १.११ लाख रूपये घेतले.
एकंदर काय तर या शोच्या प्रमोशनसाठी शाहरूखची लोकप्रीयता कॅश करणे मेकर्सला चांगलेच महागात पडले.