शाहरूख खानने ‘रईस’ बघण्यासाठी मिस्त्र आणि जॉर्डनच्या प्रेक्षकांना घातली भावनिक साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:13 IST2017-02-23T10:39:22+5:302017-02-23T16:13:43+5:30
शाहरूख खानच्या ‘रईस’ने त्याच्या स्टेट््सला शोभेल असे अपयश मिळवले नसले तरी, बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवल्याने काहीसे ...

शाहरूख खानने ‘रईस’ बघण्यासाठी मिस्त्र आणि जॉर्डनच्या प्रेक्षकांना घातली भावनिक साद
श हरूख खानच्या ‘रईस’ने त्याच्या स्टेट््सला शोभेल असे अपयश मिळवले नसले तरी, बॉक्स आॅफिसवर शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवल्याने काहीसे समाधानी असलेल्या शाहरूखला आता मिस्त्र आणि जॉर्डनच्या प्रेक्षकांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या बुधवारी ‘रईस’ मिस्त्र आणि जॉर्डनमध्ये रिलीज करण्यात आला असून, तो प्रेक्षकांना भावणार का याविषयी आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. सिनेमात मुस्लीमविरोधी दृश्य दाखविण्यात आल्याने या सिनेमावर पाकमध्ये बॅन लावण्यात आला होता. त्यावेळी सिनेमातील मुख्य अभिनेत्री माहिरा खान खूपच निराश झाली होती. आता जॉर्डन आणि मिस्त्रमध्ये सिनेमा रिलीज केला गेल्याने माहिरासह शाहरूखही खूश असल्याचे समजते. शाहरूखने तर येथील प्रेक्षकांना ट्विटरवरून एकप्रकारे आवाहनच केले आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले की, ‘तुम्हाला हा सिनेमा आवडेल, याची मला अपेक्षा वाटते. भारतीय सिनेमा बघण्यासाठी तुमचे आभार’
राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात गुजरातमधील दारू व्यवसायाविषयी दाखविण्यात आले आहे. सिनेमात शाहरूख खान रईस आलमच्या भूमिकेत आहे. शाहरूख व्यतिरिक्त, सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी याचीही महत्त्वाची भूमिका आहे. बॉक्स आॅफिसवर सिनेमाने चांगला गल्ला जमविल्याने वर्ल्ड वाइज कलेक्शनमध्येही आगेकूच करीत आहे.
दरम्यान, शाहरूखने जॉर्डन आणि मिस्त्रच्या प्रेक्षकांना एकप्रकारे भावनिक साद घातल्याने, प्रेक्षक त्याला कितपत प्रतिसाद देतील हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. जर या सिनेमाने जॉर्डन आणि मिस्त्रमध्ये कलेक्शन केले तर सिनेमाच्या कमाईचे आकडे वाढणार असून, आमिर-सलमानच्या रेकॉर्डला टक्कर देण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Raees releases in Egypt & Jordan today. Hope u all enjoy it & thanks for watching Indian films. My love to u all. pic.twitter.com/dbR4Sk2J75— Shah Rukh Khan (@iamsrk) February 22, 2017}}}} ">http://
}}}} ">Raees releases in Egypt & Jordan today. Hope u all enjoy it & thanks for watching Indian films. My love to u all. pic.twitter.com/dbR4Sk2J75— Shah Rukh Khan (@iamsrk) February 22, 2017
Raees releases in Egypt & Jordan today. Hope u all enjoy it & thanks for watching Indian films. My love to u all. pic.twitter.com/dbR4Sk2J75— Shah Rukh Khan (@iamsrk) February 22, 2017