Shaan Birthday Special : शानची फिल्मी लव्ह स्टोरी, 6 वर्षे लहान तरूणीला केलं होतं प्रपोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 09:00 IST2018-09-29T16:25:38+5:302018-09-30T09:00:00+5:30

हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध गायक शान याचा आज ४६वा वाढदिवस आहे. शानने फक्त हिंदीतच नाही तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू व कन्नड भाषेतील गाणी गायली आहेत.

Shaan Birthday Special: Shaan's Love Story, he married with 6 years younger girl | Shaan Birthday Special : शानची फिल्मी लव्ह स्टोरी, 6 वर्षे लहान तरूणीला केलं होतं प्रपोझ

Shaan Birthday Special : शानची फिल्मी लव्ह स्टोरी, 6 वर्षे लहान तरूणीला केलं होतं प्रपोझ

ठळक मुद्देशानने केले त्याची गर्लफ्रेंड राधिकासोबत २००० साली लग्नशान व राधिकाच्या लग्नाला झाली १८ वर्षे पूर्ण

हिंदी सिनेसृष्टीतला प्रसिद्ध गायक शान याचा आज ४६वा वाढदिवस आहे. शानने फक्त हिंदीतच नाही तर बंगाली, मराठी, उर्दू, तेलगू व कन्नड भाषेतील गाणी गायली आहेत. हल्ली तो फारशी गाणी गाताना दिसत नाही. मात्र आजही बॉलिवूडमधील लोकप्रिय गायकांमध्ये त्याचा समावेश आहे.

शानचे खरे नाव शांतनु मुखर्जी आहे. त्याच्या कुटुंबातील काही सदस्य संगीत क्षेत्राशी संबंधित आहेत. शानने गायलेली रोमँटिक गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहेत. शानचे आजोहा जाहर मुखर्जी गीतकार होते. त्याचे वडील मानस मुखर्जी संगीत दिग्दर्शक होते. शान तेरा वर्षांचा असताना त्याच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर शानच्या आईन गाणी गावून घरगृहस्थी चालवली होती. शानने आपल्या करिअरला वयाच्या १७व्या वर्षी सुरूवात केली. तो जाहिरातीतील जिंगल्स गायचा. गाणी गाण्याव्यतिरिक्त शानने सारेगमपा लिटिल चॅम्प्स आणि स्टार वॉइस ऑफ इंडिया या लोकप्रिय शोचे सूत्रसंचालन केले आहे. त्याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्मफेअरचा पुरस्कारही मिळाला आहे.

शानने त्याची गर्लफ्रेंड राधिकासोबत २००० साली लग्न केले. त्याला सोहम व शुभ अशी दोन मुले आहेत. शान व राधिकाची लव्हस्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. या दोघांची जेव्हा भेट झाली होती तेव्हा राधिका १७ वर्षांची आणि शान २४ वर्षांचा होता. शान आधीपासून खूप लाजाळू आहे. एक दिवस ते दोघे बीचवर गेले होते. त्यावेळी शान गुडघ्यावर बसला व राधिकाला म्हणाला की, हा सागर, हे आकाश व ही हवा साक्षीदार आहेत, तु माझ्याशी लग्न करशील का? राधिकाला प्रपोझ केल्यानंतर शान तिच्या घरातल्यांना भेटायला गेला. रंगबेरंगी ड्रेस घातलेल्या शानला पाहिल्यानंतर राधिकाच्या घरातले हैराण झाले होते. अखेर त्यांच्या घरातले लग्नासाठी तयार झाले व राधिका व शान २०००साली विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला आता १८ वर्षे झाले असून ते दोघेही खूप खूश आहेत.

Web Title: Shaan Birthday Special: Shaan's Love Story, he married with 6 years younger girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Shaanशान