​टिंडरवर सैफ अली खानचा फोटो पाहून भाळली अन् पुरती फसली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 13:57 IST2017-04-02T08:27:57+5:302017-04-02T13:57:57+5:30

टिंडर या डेटींग अ‍ॅपवर बनावट फोटो लावून एका ब्रिटीश व्यक्तिने एका महिलेची फसवणूक केली. अँटोनी राय, असे या व्यक्तिचे ...

Seeing Saif Ali Khan's photo on Tinder's sensation and scarcity! | ​टिंडरवर सैफ अली खानचा फोटो पाहून भाळली अन् पुरती फसली!

​टिंडरवर सैफ अली खानचा फोटो पाहून भाळली अन् पुरती फसली!

ंडर या डेटींग अ‍ॅपवर बनावट फोटो लावून एका ब्रिटीश व्यक्तिने एका महिलेची फसवणूक केली. अँटोनी राय, असे या व्यक्तिचे नाव. त्याने एना रो नामक महिलेला असे काही फसवले की, तुम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही  ४४ वर्षांच्या अ‍ॅन्टोनीने टिंडरवर त्याचा फोटो लावला होता. हा फोटो पाहून एना त्याच्यावर अशी काही लट्टू झाली की विचारता सोय नाही. पण मग या प्रेमकथेत टिष्ट्वस्ट आला. कारण टिंडरवरचा तो फोटो अँटोनीचा नव्हताच मुळी. तो होता, सैफ अली खान याचा. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे.
अँटोनीने त्याच्या प्रोफाईलवर सैफ अली खानचा फोटो लावून एनाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मी बिझनेसमॅन असून कामासाठी विदेशात फिरत असल्याची बतावणी करून तो एनाच्या जवळ आला. एना त्याचे रूप पाहून त्याच्यावर भाळली. तिने त्याला स्वत:बद्दल सगळे काही सत्य सांगितले. पण अँटोनीने केवळ तिचा फायदा घेतला. टिंडरवरच्या त्यांच्या प्रेमाला सहा महिने झाले. एनाने त्याना याचे सेलिब्रेशन करण्यासाठी भेटायला बोलावले. पण आईची तब्येत ठीक नाही म्हणून अँटोनीने ही भेट टाळली. यानंतर अँटोनी  एनालाच टाळू लागला. एनाला संशय आल्यावर तिने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतली. याचे रिझल्ट समोर आले तेव्हा एनाला मोठा धक्का बसला.

ALSO READ : ​सैफ अली खानने ‘या’ स्पेशल लेडीसाठी खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट!

कारण प्रोफाईलवरचा अँटोनीचा फोटो खोटा होता. त्याचे लग्न आधीच झाले होते. मुलींना फसवण्यासाठी तो बॉलिवूड स्टार्सचे फोटो वापरून खोटे सोशल अकाऊंट बनवायचा. हे सगळे कळल्यानंतर एनाने अँटोनीला चांगलाच धडा शिकवायचे ठरले आहे. तर दुसरीकडे सैफने या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली.

Web Title: Seeing Saif Ali Khan's photo on Tinder's sensation and scarcity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.