/> सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशा तीन मुलांचा बाबा असलेला अनिल कपूर वाढत्या वयासोबत आणखीच हँडसम होत चाललायं. किंबहुना नव्या हिरोंना लाजवेल अशा पद्धतीने त्याने स्वत:ला मेन्टेन केले आहे. आता तर अनिल कपूर मुलगा हर्षवर्धन आणि पुतण्या अर्जून कपूरपेक्षाही हँडसम दिसू लागला आहे. त्याचा नवा लूक पाहिल्यानंतर आम्हीच नाही तर तुम्हीही हे मानाल. होय, अलिकडे अनिलने एक नवी हेअरकट केली आहे. तेही आपल्या वाढदिवसाच्या काहीदिवसांपूर्वी. येत्या २४ डिसेंबरला अनिल कपूर वयाची ६० वर्षे पूर्ण करतोय. खास यादिवसासाठी अनिलने हे नवीन लूक स्वीकारल्याचे बोलले जात आहे. ५९ वर्षांचा अनिल कपूर या नव्या हेअरस्टाईलमध्ये चांगलाच यंग दिसतो आहे.‘आयुष्य खूप लहान आहे. त्यामुळे एक नवे लूक स्वीकारले आहे,’ या पोस्टसह टिष्ट्वटरवर त्याने आपल्या या नव्या लूकचा एक फोटो शेअर केला आहे. या टिष्ट्वटवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. हृतिक रोशननेही अनिलच्या या फोटोला लाईक करत, त्याच्या हेअरस्टाईलवर ‘आऊटस्टँडिंग’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या अनिल कपूर ‘इम्पेक्ट पर्सन आॅफ दी ईयर2016’ अवार्ड्सच्या तयारीत व्यस्त आहेत. ८० व ९० च्या दशकात अनिलच्या चित्रपटांनी लोकांना वेड लावले होते. आजही त्याचा चार्म कायम आहे.
Web Title: Seeing the new look of Anil Kapoor, you will say 'Jhakaas' !!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.