पाहा : राजीव खंडेलवाल-गौहर खान यांचा लिपलॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 19:15 IST2016-06-11T13:45:34+5:302016-06-11T19:15:34+5:30
राजीव खंडेलवाल आणि गौहर खान यांचा ‘फिवर’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आज शनिवारी ‘फिवर’ चा टीजर रिलीज झाला.

पाहा : राजीव खंडेलवाल-गौहर खान यांचा लिपलॉक
र जीव खंडेलवाल आणि गौहर खान यांचा ‘फिवर’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १७ जूनला चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होत आहे. तत्पूर्वी आज शनिवारी ‘फिवर’ चा टीजर रिलीज झाला. ‘फिवर’ हा एक सस्पेंस थ्रिलर चित्रपट आहे. ज्यात लव्ह, सेक्स आणि सस्पेन्स असा सगळा मसाला आहे. रिलीज झालेल्या टीजरमध्ये ‘फिवर’मधील काही थ्रिलर सीन दिसत आहे. यात सगळे काही बॅकवर्ड होताना दिसत आहे. राजीव व गौहरची झलकही यात दिसते आहे. साहजिकच गौहर यात अतिशय हॉट अंदाजात दिसत आहे. चित्रपटाची हॉटनेस वाढवण्यासाठी यात हॉलिवूड अॅक्ट्रेस जेम्मा एकिंसन व कॅटरिना मॉरिनो याही दिसणार आहे. राजीव झावेरी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ जुलैला रिलीज होत आहे. तेव्हा बघूयात, ‘फिवर’ चा टीजर!!