SEE PICS : श्रीदेवीचे ‘हे’ फोटो बघून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2017 21:36 IST2017-07-04T16:06:58+5:302017-07-04T21:36:58+5:30

अभिनेत्री श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट ७ जुलै रोजी रिलीज होणार असून, पुन्हा एकदा श्रीदेवी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणार ...

SEE PICS: You will not be shocked to see Sridevi's 'This' photo! | SEE PICS : श्रीदेवीचे ‘हे’ फोटो बघून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

SEE PICS : श्रीदेवीचे ‘हे’ फोटो बघून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

िनेत्री श्रीदेवीचा ‘मॉम’ हा चित्रपट ७ जुलै रोजी रिलीज होणार असून, पुन्हा एकदा श्रीदेवी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे करणार आहे. या अगोदर २०१२ मध्ये आलेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात श्रीदेवी बघावयास मिळाली होती. या दोन्ही चित्रपटांतून एक गोष्ट स्पष्ट होते की, श्रीदेवीचा जलवा तसूभरही कमी झालेला नाही. आजही ती इंडस्ट्रीमध्ये भल्याभल्या अभिनेत्रींना मात देऊ शकते, अशी तिच्यात क्षमता आहे. १९७५ मध्ये ‘जुली’ या चित्रपटातून डेब्यू करणाºया श्रीदेवीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. प्रत्येक चित्रपटात तिचा एक अंदाज होता. एखादी भूमिका साकारताना आपला लुक कसा असावा, यावर ती नेहमीच भर द्यायची. श्रीदेवीचे काही वेगवेगळे आणि स्पेशल लुक आज आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत. 







श्रीदेवीने तिच्या डेब्यू चित्रपटात चाइल्ड आर्टिस्टची भूमिका साकारली होती. सुरुवातीच्या चित्रपटात तिला हवे तसे यश मिळाले नाही. मात्र १९८३ मध्ये आलेल्या ‘हिम्मतवाला’ या चित्रपटामुळे ती रातोरात सुपरस्टार बनली. यानंतर मात्र श्रीदेवीने कधीच मागे वळून बघितले नाही. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देत तिने इंडस्ट्रीमध्ये दबदबा निर्माण केला. श्रीदेवीचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा होता. त्यामुळेच तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असे. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर किती कलेक्शन केले यापेक्षा श्रीदेवीच्या भूमिकेचे किती कौतुक झाले, यावर जास्त चर्चा रंगायची. 









मात्र आज आम्ही तुम्हाला जे फोटोज् दाखविणार आहोत, त्यामध्ये श्रीदेवीचा ग्लॅमरस नव्हे तर विचित्र अवतार तुम्हाला दिसणार आहेत. हे फोटो बघून तुम्ही म्हणाल की, ही श्रीदेवी आहे काय? परंतु हे अभिनेत्री श्रीदेवीचेच फोटोज् असून, यामध्ये तिचा अवतार आश्चर्यचकित करणारा आहे. इंडस्ट्रीमध्ये वाटचाल करीत असताना श्रीदेवीचा लुक कसा बदलत गेला, हे फोटोवरून स्पष्ट होते. 







श्रीदेवीच्या पर्सनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास, तिने १९९६ मध्ये निर्माता बोनी कपूर यांच्याशी विवाह केला. दोघांची लव्हस्टोरी ‘मिस्टर इंडिया’ (१९८७) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुरू झाली. वास्तविक श्रीदेवीने बोनी कपूर यांच्याशी केलेला विवाह हा अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. त्यावेळी अशाही चर्चा रंगल्या होत्या की, श्रीदेवीचे बोनी कपूर यांच्याबरोबर बळजबरीने लग्न लावून दिले गेले. परंतु काहीही असो, सध्या श्रीदेवी तिच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी असून, अजूनही चित्रपटांमध्ये कार्यरत आहे. श्रीदेवी आणि बोनी यांना दोन मुली असून, लवकरच तिची मोठी मुलगी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. 

Web Title: SEE PICS: You will not be shocked to see Sridevi's 'This' photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.