SEE PICS : पत्नी मीरा राजपूतसोबत शाहिद कपूर कुठे जात असावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 17:05 IST2017-07-29T11:35:47+5:302017-07-29T17:05:47+5:30

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील सर्वाधिक क्यूट कपल्सपैकी एक आहे. जेव्हा हे दोघे एकत्र स्पॉट ...

SEE PICS: Where should Shahid Kapoor go along with wife Mira Rajput? | SEE PICS : पत्नी मीरा राजपूतसोबत शाहिद कपूर कुठे जात असावा?

SEE PICS : पत्नी मीरा राजपूतसोबत शाहिद कपूर कुठे जात असावा?

िनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील सर्वाधिक क्यूट कपल्सपैकी एक आहे. जेव्हा हे दोघे एकत्र स्पॉट होतात, तेव्हा माध्यमांमध्ये त्यांची एकच चर्चा रंगते. हे दोघे नुकतेच मुंबई येथील ब्लू रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेले होते, जेव्हा हे रेस्टॉरंटमधून बाहेर पडले तेव्हा त्यांचे काही क्यूट फोटोज कॅमेºयात कैद झाले. नेहमीप्रमाणेच हे दोघे ‘मेड फॉर इच अदर’सारखे वाटत होते. शाहिद यावेळी ब्लॅक ड्रेसमध्ये होता, तर मीराने तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसावे म्हणून व्हाइट कपडे परिधान केले होते.  





दोघेही एकमेकांसोबत खूपच सुंदर दिसत होते. मात्र या दोघांमध्ये मुलगी मीशाची कमतरता स्पष्टपणे भासत होती. कारण जेव्हा जेव्हा हे दोघे स्पॉट झाले तेव्हा-तेव्हा या दोघांसोबत मीशा बघावयास मिळाली. काही दिवसांपूर्वीच शाहिद पत्नी मीरा आणि मुलगी मीशाबरोबर आयफा अवॉर्डसाठी न्यू यॉर्कला गेला होता. त्याठिकाणीदेखील हे कपल चर्चेत होते. शिवाय मुलगी मीशासोबतचे शाहिदचे काही व्हिडीओ आणि फोटोज् सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाले होते. 





अवॉर्ड नाइटदरम्यान शाहिदने स्टायलिश पत्नी मीरासोबत धमाकेदार एंट्री केली होती. त्यावेळी सगळ्यांच्याच नजरा या दाम्पत्यावर खिळल्या होत्या. यावेळी शाहिद ब्लॅक सूटमध्ये, तर मीरा आॅरेंज गाउनमध्ये बघावयास मिळाली. या दोघांचा आनंद तेव्हा द्विगुणित झाला जेव्हा शाहिदला त्याच्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी शाहिदने त्याच्या चाहत्यांचे आभारही मानले होते. 





सध्या हे दाम्पत्य मुंबईत असून, एकमेकांसोबत अधिकाधिक वेळ व्यतित करीत आहेत. शाहिद ‘पद्मावती’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्याकडे या चित्रपटाव्यतिरिक्त अन्य चित्रपट नसल्याने तो सध्या त्याच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत आहे. मात्र त्याचबरोबर तो इतरही काही प्रोजेक्टवर विचार करीत असल्याने लवकरच तो इतर चित्रपटांच्या शूटिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे.  

Web Title: SEE PICS: Where should Shahid Kapoor go along with wife Mira Rajput?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.