SEE PICS : आत्या सोहा अली खानला एकटक बघत होता चिमुकला तैमूर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 17:16 IST2017-08-19T11:46:08+5:302017-08-19T17:16:08+5:30

सध्या पतौडी परिवारात आनंदी आनंद आहे. अगोदरच सैफ आणि करिनाच्या चिमुकल्याने सर्वांना लळा लावला असताना, सैफची बहीण सोहा अली ...

SEE PICS: Timur was looking at Soha Ali Khan in tears! | SEE PICS : आत्या सोहा अली खानला एकटक बघत होता चिमुकला तैमूर !

SEE PICS : आत्या सोहा अली खानला एकटक बघत होता चिमुकला तैमूर !

्या पतौडी परिवारात आनंदी आनंद आहे. अगोदरच सैफ आणि करिनाच्या चिमुकल्याने सर्वांना लळा लावला असताना, सैफची बहीण सोहा अली खान हिच्या घरातदेखील लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोहा गर्भवती असून, आज एका विशेष (बेबी शॉवर) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता बरेचसे स्पेशल पाहुणेही उपस्थित होते. 



यात सर्वांत स्पेशल पाहुणा होता, तो सर्वांचा लाडका चिमुकला तैमूर. तैमूर आणि त्याची आत्या सोहाचा एक फोटो सध्या व्हायरल होत असून, फोटोमध्ये तो एकटक आत्या सोहाकडे बघताना दिसत आहे. नाजूक आणि निरागसपणे दिसत असलेल्या तैमूरचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोहाने या फोटोसह इतरही बरेचसे फोटो सोशल अकाउंटवर शेअर केले आहेत. 



यातील एका फोटोमध्ये सोहा वहिणी करिना आणि तिची बहीण करिष्मा कपूरसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोत करिना आणि करिष्माने एकसारखेच जॅकेट घातले असून, त्यात त्या खूपच सुंदर दिसत आहेत. दरम्यान, सोहाच्या बेबी शॉवरमध्ये कोंकणा सेन शर्मा आणि नेहा धूपिया यादेखील उपस्थित होत्या. सोहाने हा सोहळा खूपच एन्जॉय केला. सोहाचा पिंक ड्रेसही खूपच क्यूट होता. त्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. 





सोहा काही दिवसांपूर्वीच सैफच्या बर्थ डे पार्टीत बघावयास मिळाली होती. यावेळीही सोहाचा अंदाज बघण्यासारखा होता. दरम्यान, सोहा आणि कुणाल खेमूच्या परिवारात सर्व आनंदी असून, नव्या पाहुण्याच्या स्वागताची दोन्ही परिवाराकडून जय्यत तयारी केली जात आहे. सैफचा मुलगा तैमूर अगोदरच सगळ्यांचा जीव की प्राण बनला असताना सोहाचा चिमुकलाही सर्वांचा लाडका असेल यात शंका नाही. 

Web Title: SEE PICS: Timur was looking at Soha Ali Khan in tears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.