​SEE PICS: मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसली शाहिद कपूर अन् मीरा राजपूतची लाजवाब केमिस्ट्री! तुम्हीही व्हाल दंग!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 07:07 AM2017-11-01T07:07:44+5:302017-11-01T12:40:06+5:30

गौरी खान, सुजैन खान, ट्विंकल खन्ना, किरण राव या सगळ्या सुपरस्टार्सच्या बायका ‘ग्रेसफुली’ मॅगझिन्सच्या कव्हर पेजसाठी ग्लॅमरस पोज देताना ...

SEE PICS: Shahid Kapoor and Mira Rajput's cheerful chemistry on the cover page! You will be angry! | ​SEE PICS: मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसली शाहिद कपूर अन् मीरा राजपूतची लाजवाब केमिस्ट्री! तुम्हीही व्हाल दंग!!

​SEE PICS: मॅगझिनच्या कव्हरपेजवर दिसली शाहिद कपूर अन् मीरा राजपूतची लाजवाब केमिस्ट्री! तुम्हीही व्हाल दंग!!

googlenewsNext
री खान, सुजैन खान, ट्विंकल खन्ना, किरण राव या सगळ्या सुपरस्टार्सच्या बायका ‘ग्रेसफुली’ मॅगझिन्सच्या कव्हर पेजसाठी ग्लॅमरस पोज देताना दिसतात. आता या यादीत शाहिद कपूरची बेटरहाफ मीरा राजपूत हिचेही नाव जुळले आहे. होय, हबी शाहिदसोबत मीरा ‘हॅलो’ मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली आहे. या मॅगझिनच्या कव्हरपेजवरील शाहिद व मीराचा रॉयल अवतार पाहून मीराचे हे पहिले मॅगझिन फोटोशूट आहे, यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. आपल्या पहिल्याच फोटोशूटमध्ये मीराने प्रोफेशनल स्टार्सला मागे टाकले आहे. शाहिद व मीराची केमिस्ट्रीही लाजवाब आहे. मॅगझिनवरील या दोघांची इतकी लाजवाब केमिस्ट्री बघता, हे कपल सिल्व्हर स्क्रिनवरही एकत्र दिसले तर नवल वाटायला नको.



कव्हरपेजवरील फोटोत मीराने हिरव्या रंगाची सिल्क चोळी आणि पिंक लेहंगा परिधान केला आहे. मॅचिंग ज्वेलरी तिच्या सौंदर्यात भर घालतेयं. कुंदनचे बाजूबंद, हातातील कडे सगळेच मीरावर खुलून दिसतेय. शाहिदही रॉयल लूकमध्ये एकदम हटके दिसतोय.



याच फोटोशूटच्या दुस-या एका फोटोत मीरा शाहिदच्या मांडीवर बसलेली दिसतेय. या फोटोतील मीराचा हॉट अंदाज बघण्यासारखा आहे. तिचा हा हॉट अवतार बघता, येत्या काळात मीराला सोलो कव्हरसाठी आॅफर मिळण्याची शक्यता वाढली आहे. तुम्हीही मीरा व शाहिदचे हे हॉट मॅगझिन फोटोशूट बघा आणि ते कसे वाटले, ते आम्हाला कळवा. 



ALSO READ:  मम्माचे बोट धरून कुठे निघाली शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा?

करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’ या शोमध्ये मीरा व शाहिद एकत्र दिसले होते. या शोमध्ये मीरा कॅमेºयापुढे अतिशय आत्मविश्वासाने वावरताना दिसली होती.
बॉलिवूडबाहेरची असूनही मीराने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाहिदची पत्नी म्हणून नव्हे तर मीरा राजपूत या नावाने तिला ओळखले जातेय. तिचा बॉलिवूडमधील वावर बघता, मीराचा इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही,यावर अनेकदा विश्वासही बसत नाही. मीरा व शाहिदच्या लग्नाला सुमारे दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांत शाहिदच्या आयुष्य आपले मानून मीरा चालली आहे. एकंदर काय तर पत्नीच्या भूमिकेत मीरा एकद फिट बसलीय. आता अभिनेत्री म्हणून ती पडद्यावर दिसलीच तर किती आत्मविश्वासाने वावरते ते बघूच.

Web Title: SEE PICS: Shahid Kapoor and Mira Rajput's cheerful chemistry on the cover page! You will be angry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.