SEE PICS : अपघाती मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नाही ‘हा’ अभिनेता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 22:11 IST2017-06-27T14:28:36+5:302017-06-27T22:11:16+5:30

दाक्षिणात्य अभिनेता रवि तेजा याचा भाऊ अभिनेता भारत भूपतिराजू (४६) यांचे एक रोड अपघातात निधन झाले. गेल्या रविवारी जुबली ...

SEE PICS: 'Hai' actor has not reached the funeral of an accidental brother! | SEE PICS : अपघाती मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नाही ‘हा’ अभिनेता!

SEE PICS : अपघाती मृत्यू झालेल्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचला नाही ‘हा’ अभिनेता!

क्षिणात्य अभिनेता रवि तेजा याचा भाऊ अभिनेता भारत भूपतिराजू (४६) यांचे एक रोड अपघातात निधन झाले. गेल्या रविवारी जुबली हिल्स स्थित महाप्रस्थानम् येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रवि तेजा आणि त्याच्या परिवारातील बरेचसे सदस्य पोहोचले नव्हते. एका प्रसिद्ध वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर रवि तेजा आणि त्याच्या फॅमिलीला जबरदस्त धक्का बसला आहे. ज्यामुळे कोणीही अंत्यसंस्काराला येण्याचे धाडस केले नाही. रवि तेजाने तर भावाचे अखेरचे दर्शनही घेतले नाही. 



जेव्हा ही घटना घडली तेव्हा भारत भूपतिराजू यांच्यावर उस्मानिया सामान्य रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. त्यांनतर त्यांचा मृतदेह मर्चुरीत ठेवण्यात आला होता. मात्र अशातही रवि तेजा भावाचा देह बघण्यासाठी आला नव्हता. त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. सूत्रानुसार जेव्हा रवि तेजाला भावाच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा तो शूटिंगमध्ये व्यस्त होता. परंतु अशातही त्याने शूटिंग न थांबविता ती पूर्ण केली. गेल्या शनिवारी हैदराबाद येथील आउटर रिंग रोडवर कोतवालगुडा येथे भूपतिराजूची लाल रंगाची स्कोडा कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली होती. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भूपतिराजू शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शमशाबाद येथून गाचीबावली येथे जात होते. ते अविवाहित होते. 



दरम्यान, भूपतिराजू यांच्या अंत्यसंस्काराला रवि तेजाचा लहान भाऊ रघूदेखील आला नव्हता. शिवाय परिवारातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. रवि तेजाचा जवळचा मित्र उत्तेजने याविषयी खुलासा करताना सांगितले की, या दुर्दैवी घटनेनंतर रवि तेजा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला मोठा धक्का बसला. ज्यामुळे ते अंत्यसंस्काराला येऊ शकले नाही. कारण त्यांना भूपतिराजू यांचा छन्न-विछन्न झालेला मृतदेह बघण्याची हिम्मत नव्हती. दरम्यान, पोलिसांनी संबंधित ट्रक चालकविरोधात चुकीच्या ठिकाणी ट्रक पार्क केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 



भूपतिराजू यांनी साउथमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. शिवाय त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही काही प्रमाणात वादग्रस्त राहिले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांना कोकेन बाळगल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे. रवि तेजा आणि त्यांच्यात नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. एका चित्रपटात भूपतिराजू यांनी रवि तेजाच्या यंगर व्हर्जनची भूमिका साकारली होती. 

Web Title: SEE PICS: 'Hai' actor has not reached the funeral of an accidental brother!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.