​see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 12:49 IST2018-06-10T07:19:36+5:302018-06-10T12:49:36+5:30

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत. एकीकडे हे कथित कपल ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. ...

See pics: Alia Bhatt reached dinner with Ranbir Kapoor family! | ​see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!

​see pics :रणबीर कपूरच्या फॅमिलीसोबत डिनर डेटवर पोहोचली आलिया भट्ट!!

बीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या डेटींगच्या बातम्या सध्या जोरात आहेत. एकीकडे हे कथित कपल ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. दुसरीकडे यादरम्यानचा मोकळा वेळ ते एकमेकांसोबत घालवत आहेत. शनिवारी रात्री रणबीर व आलिया मुंबईतील वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले.



डिनर संपवून रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दोघांनाही पाहिले गेले. विशेष म्हणजे, यावेळी रणबीर व आलिया एकटे नव्हते, तर रणबीरचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत होते. आई नीतू सिंग, बहिण रिद्धिमा आणि तिची मुलगी असे सगळे होते. 
 


अलीकडे एका मुलाखतीत रणबीर आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता.  ‘हे सध्या खूपच नवनवीन आहे. त्यामुळे मला यावर फारचे बोलायचे नाही. यास (नात्याला) आणखी काहीकाळ हवा आहे. काहीतरी स्पेस हवी आहे. एक कलाकार म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आलिया खूपच चांगली आहे. जेव्हा मी तिचे काम बघतो, तिचा अभिनय बघतो किंवा तिच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल जाणून घेतो तेव्हा ती खूपच महत्त्वाकांक्षी असल्याचे मला दिसते. दोघांविषयी सांगायचे झाल्यास, आमच्यासाठी हे सर्व नवे आहे. त्यामुळे ते आणखी पुढे जायला हवे,’असे तो म्हणाला होता.

ALSO READ : सलमान खानला का आवडला नाही ‘संजू’तील रणबीर कपूरचा अभिनय?

या अगोदर एका मुलाखतीत रणबीरने आलियासोबतच्या नात्याबद्दल सांगितले होते की, ‘होय, एक मुलगा म्हणून मला तिच्यावर क्रश आहे, ’ असे तो म्हणाला होता.
दरम्यान, हे दोघे पहिल्यांदा ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बघावयास मिळणार आहे. चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन, मौनी रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. उपलब्ध माहितीनुसार, ब्रह्मास्त्र एक नव्हे तर तीन भागात प्रदर्शित होणार आहे. त्याचा पहिला भाग १५ आॅगस्ट २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.  

Web Title: See pics: Alia Bhatt reached dinner with Ranbir Kapoor family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.