SEE PIC : दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करीत आहे मान्यता दत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 14:25 IST2017-03-19T08:55:51+5:302017-03-19T14:25:51+5:30
अभिनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त सध्या हॉलिडे मूडमध्ये असल्याचे बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुलांसमवेत संजूबाबाच्या ...

SEE PIC : दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करीत आहे मान्यता दत्त
अ िनेता संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त सध्या हॉलिडे मूडमध्ये असल्याचे बघावयास मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच ती मुलांसमवेत संजूबाबाच्या आगरा येथे सुरू असलेल्या सिनेमाच्या सेटवर पोहचली होती. यावेळी संजूने सहपरिवार आगरा सहलही केली होती. आता मान्यता दुबई येथे पोहोचली असून, याठिकाणी ती मुलांसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे.
![]()
![]()
मुलगा शाहरान आणि मुलगी इकरासोबत तिचे काही फोटोज् समोर आले असून, त्यात मान्यताचा लूक खूपच स्टनिंग दिसत आहे. डेनिम हॉट पॅण्ट आणि पिंक टॉप घातलेली मान्यता खूपच सुुंदर दिसत आहे. ती मुलांसमवेत लंच करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये जात असताना दिसत आहे.
![]()
![]()
दरम्यान, संजय दत्त सध्या त्याच्या आगामी ‘भूमी’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने मान्यता मुलांसोबत हॉलिडे एन्जॉय करीत आहे. खरं तर बºयाच कालावधीनंतर दत्त परिवारात आनंदाचे क्षण परतले आहेत. संजय दत्त शिक्षा भोगून बाहेर पडला असून, त्याच्या फिल्मी करिअरकडे तो पुन्हा वळाला आहे. अशात आपल्या पतीला वेळोवेळी साथ देणारी मान्यताही आता काहीशी रिलॅक्स झाली असून, मुलांसमवेत ती सध्या आनंदाचे क्षण जगत आहे.
![]()
![]()
संजूबाबा जरी तिच्यासोबत दिसत नसला तरी, मान्यता मुलांसोबत खूपच आनंदी दिसत आहे. मात्र मान्यता आणि मुले संजूबाबाला मिस करत असतील यात शंका नाही. पण काहीही असो एवढ्या दिवसांनंतर दत्त परिवारात आलेल्या आनंदाच्या क्षणामुळे संजूबाबाचे फॅन्स खूश नसतील तरच नवल.