SEE PIC : शाहिद कपूरने खरेदी केली १.३ कोटींची मर्सडीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 17:01 IST2017-04-05T11:30:30+5:302017-04-05T17:01:27+5:30
या वर्षातला शाहिद कपूरचा पहिलाच चित्रपट ‘रंगून’ भलेही बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नसला तरी, त्याच्या स्टारडमवर कुठलाही ...
.jpg)
SEE PIC : शाहिद कपूरने खरेदी केली १.३ कोटींची मर्सडीज
य वर्षातला शाहिद कपूरचा पहिलाच चित्रपट ‘रंगून’ भलेही बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखवू शकला नसला तरी, त्याच्या स्टारडमवर कुठलाही परिणाम झालेला दिसत नाही. कारण जेव्हा तो त्याच्या नव्या कारमध्ये पत्नी मीरा राजपूतबरोबर दिसला तेव्हा हे स्पष्टपणे दिसत होते की, आगामी काळात शाहिद बॉलिवूडमध्ये पुन्हा झेप घेईल.
![]()
शाहिदने नुकतीच १.३ कोटी रुपयांची ब्रॅण्ड न्यू कार खरेदी केली आहे. गेल्या सोमवारी तो पत्नी मीरा राजपूत हिच्याबरोबर नव्या मर्सडीज एस क्लासमध्ये दिसला. दोघांनीही अगोदर मीडियाच्या कॅमेºयांना पोज दिली. नंतर दोघेही लॉँग ड्राइव्हसाठी निघून गेले. फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, दोघे किती रिलॅक्स मुडमध्ये बघावयास मिळत आहेत. खरं तर सर्वसामान्य असो वा सेलिब्रिटी त्यांना नेहमीच नव्या कारविषयी उत्साह असतो. असाच काहीसा उत्साह या दाम्पत्याच्या चेहºयावर स्पष्टपणे दिसत आहे.
![]()
काळ्या रंगाच्या या लांबलचक मर्सडीजमध्ये जेव्हा शाहिद आणि मीराला बघण्यात आले तेव्हा बघणाºयांनी त्यांना घेराव घातला. छायाचित्रकारांनी तर शाहिद आणि मीराचा हा उत्साह कॅमेºयात टीपण्याची एकही संधी सोडली नाही. मीराने कॅमेरे बघताच स्वत:ला सावरण्यास सुरुवात केली. पुढे दोघांनीही छायाचित्रकारांना पोज देत नव्या कारचा आनंद साजरा केला.
![]()
नेहमीच शाहिद पत्नी मीरासोबत मुंबईच्या वेगवेगळ्या भागात आउटिंगवर जाताना बघावयास मिळतो. जुलै २०१५ मध्ये शाहिद आणि मीरा विवाहबंधनात अडकले. दिल्ली येथे त्यांचा विवाह झाला. मीरा शाहिदपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. जेमतेम ४० पाहुण्यांच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा पार पडला. सध्या या दाम्पत्याला मीशा नावाची मुलगी असून, नुकतीच तिची झलकही यांच्या फॅन्सना बघावयास मिळाली होती.