SEE PIC : ‘बाहुबली’च्या सेटवर जेव्हा कलाकार करायचे मौजमस्ती...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 18:34 IST2017-05-05T13:01:27+5:302017-05-05T18:34:45+5:30

‘बाहुबली’ हा चित्रपट भारतासाठी इतिहास बनला आहे. कारण चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सुपरहिट झाली असून, प्रेक्षकांच्या मनावर ती कायमस्वरूपी ...

SEE PIC: At the set of 'Bahubali', when you want to do artists ...! | SEE PIC : ‘बाहुबली’च्या सेटवर जेव्हा कलाकार करायचे मौजमस्ती...!

SEE PIC : ‘बाहुबली’च्या सेटवर जेव्हा कलाकार करायचे मौजमस्ती...!

ाहुबली’ हा चित्रपट भारतासाठी इतिहास बनला आहे. कारण चित्रपटाशी संबंधित प्रत्येक गोष्ट सुपरहिट झाली असून, प्रेक्षकांच्या मनावर ती कायमस्वरूपी कोरली गेली आहे. त्यामुळे प्रेक्षक सध्या हा चित्रपट बघताना जबरदस्त एन्जॉय करीत आहे. असाच काहीसा एन्जॉय चित्रपटातील कलाकारांनीही चित्रपट बनविताना केला आहे. विश्वास बसत नाही ना, पण आम्ही जे तुम्हाला फोटो दाखविणार आहोत, त्यावरून तुमचाही यावर विश्वास बसेल. 







खरं तर चित्रपटातील प्रत्येक पात्राने त्याच्या भूमिकेला न्याय द्यावा यासाठी दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी अथक परिश्रम घेतले. प्रत्येक कलाकाराच्या वेशभूषेपासून ते त्यांच्या लुकवर त्यांनी विशेष मेहनतही घेतली. मात्र जेव्हा कलाकारांना त्यांच्या कामातून थोडीसी उसंत मिळत असे, तेव्हा ते आपल्या सहकलाकारांसोबत मस्ती करीत असत. आम्ही जे दहा फोटो दाखवित आहोत, त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की, सेटवर का माहोल असेल. 







‘अमरेंद्र बाहुबली, भल्लालदेव, कटप्पा, माहेश्मती, देवसेना, शिवागामी आदि पात्र सध्या प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. त्यांनी कशा पद्धतीने ही भूमिका साकारली असेल, याचाच प्रत्येकजण विचार करीत असेल. परंतु तुम्ही जेव्हा हे फोटो बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की, ‘बाहुबली-२’ची निर्मिती कशा वातावरणात झाली असेल. 







असो सध्या ‘बाहुबली-२’ बॉक्स आॅफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडले असून, कमाईच्या बाबतीत आमिर खान याच्या ‘पीके’ला मागे टाकले आहे. आता या चित्रपटाचे लक्ष एक हजार कोटी रुपये असून, त्यादृष्टीने वाटचाल सुरू आहे. तसेच प्रेक्षकांना आता ‘बाहुबली-३’ बघण्याची इच्छा होत असल्याने निर्मात्यांनी यावर विचार करावा अशी चर्चा रंगत आहे. त्यामुळे आगामी काळात बाहुबली आता छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना बघता यावा यासाठीची तयारी केली जात आहे. मालिकेच्या स्वरूपात बाहुबली प्रेक्षकांपर्यंत पोहोचविला जाणार आहे. 

Web Title: SEE PIC: At the set of 'Bahubali', when you want to do artists ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.