SEE PIC: ‘रोबोट २.0’मधील रजनीकांत, एमी जॅक्शनचे फोटो लिक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 08:37 IST2017-06-11T09:44:48+5:302017-06-12T08:37:03+5:30

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि मोस्ट ब्युटिफूल एमी जॅकसन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रोबोट २.०’ची प्रेक्षक आतुरतेने वाट ...

SEE PIC: Rajinikanth's 'Robot 2.0' photo photo of Amy Junk! | SEE PIC: ‘रोबोट २.0’मधील रजनीकांत, एमी जॅक्शनचे फोटो लिक!

SEE PIC: ‘रोबोट २.0’मधील रजनीकांत, एमी जॅक्शनचे फोटो लिक!

क्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार आणि मोस्ट ब्युटिफूल एमी जॅकसन यांचा बहुचर्चित चित्रपट ‘रोबोट २.०’ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाशी संबंधित कुठलीही बाब समोर आली तरी, प्रेक्षकांना त्याविषयी उत्सुकता निर्माण होते. आता असाच काहीसा उत्सुकता वाढविणारा एक किस्सा या चित्रपटाविषयी घडला आहे. चित्रपटातील एका सीन्सप्रसंगीचे एमी आणि रजनीकांत यांचे फोटो व्हायरल झाल्याने ते बघण्यासाठी नेटिझन्सची एकच गर्दी होत आहे. एकीकडे चाहत्यांची हे फोटो उत्सुकता वाढवित आहेत, तर दुसरीकडे हे फोटो व्हायरल झालेच कसे अशी चिंता निर्मात्यांना सतावत आहे. 

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मुंबई येथे पोस्टर लॉन्च करण्यात आले होते. पोस्टरमध्ये रजनीकांत आणि अक्षयकुमार यांच्या लुकने चार चॉँद लावले होते. मात्र, या दोघांबरोबरच एमी जॅक्सनही चित्रपटात झळकणार असल्याने तिची झलक बघण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. परंतु निर्मात्यांनी एमीचा लुक समोर येऊ दिला नव्हता. मात्र आता व्हायरल झालेल्या फोटोमध्ये एमीचा लुक दिसत असून, त्यात ती जबदस्त अ‍ॅक्शनच्या भूमिकेत असेल याचेच संकेत देत आहे. फोटोमध्ये एमी एक ट्रक ड्राइव्ह करीत असून, दुसºया फोटोत रजनीकांत त्याला जोरदार धक्का देताना दिसत आहे. 

‘बाहुबली-२’नंतर अक्षयकुमार आणि रजनीकांत स्टारर ‘रोबोट २.०’चे बजेट ४५० कोटी रुपये इतके आहे. हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटात अक्षय एका सनकी वैज्ञानिकाच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटात व्हीएफएक्स इफेक्ट्सचा प्रचंड वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. काही वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘रोबोट’ याच चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. चित्रपटात ‘साय-फाय’चा ट्रिपल धमाका बघावयास मिळणार आहे. 



चित्रपटात डॉ. विसगरण, चिट्टी आणि आणखी एका कॅरेक्टरला इंट्रोड्यूस करण्यात येणार आहे. यावेळेस ती तिसरी भूमिकाच डॉ. रिर्चड्सला मदत करणार असून, तो नरसंहार करणाºया अन् अंगावर शहारे आणणाºया घटना घडवून आणणार आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अक्षयकुमार पहिल्यांदाच तामीळपटात डेब्यू करीत आहे. शिवाय एमी जॅक्सनही सौंदर्याचा जबरदस्त तडका लावणार आहे. या चित्रपटात केवळ एकच गाणे दाखविण्यात आल्याचे समजते. मात्र मजेशीर बाब ही आहे की, हा चित्रपट पहिल्या भागाचा सिक्वल नाही. कारण चित्रपटाची कथा पूर्णत: वेगळी आहे.

श्रीधर पिल्लईच्या रिपोर्टनुसार ‘रोबोट-२’चे राइट्स ११० कोटी (हिंदी, तामीळ, तेलगू) रुपयांत विकण्यात आले आहेत. तसेच लायका प्रोडक्शनने नुकतेच जी नेटवर्कसोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे या चित्रपटाला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता होती, परंतु याच काळात आणखी काही बिग बजेट चित्रपट रिलीज होणार असल्याने चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट डिसेंबर ऐवजी जानेवारी २०१८ मध्ये रिलीज होणार आहे. 

Web Title: SEE PIC: Rajinikanth's 'Robot 2.0' photo photo of Amy Junk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.