SEE PIC : प्रियंका चोपडा परतली भारतात!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 14:52 IST2017-04-22T09:22:02+5:302017-04-22T14:52:02+5:30
बॉलिवूडची देसी गर्ल तथा इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोपडा आज भारतात परतली आहे. प्रियंकाची एक झलक बघण्यासाठी तिचे फॅन्स अक्षरश: ...
(31).jpg)
SEE PIC : प्रियंका चोपडा परतली भारतात!!
ब लिवूडची देसी गर्ल तथा इंटरनॅशनल स्टार प्रियंका चोपडा आज भारतात परतली आहे. प्रियंकाची एक झलक बघण्यासाठी तिचे फॅन्स अक्षरश: आतुर झाले होते. प्रियंका विमानतळावर पोहचताच तिचा जलवा बघण्यासारखा होता. यावेळी प्रियंकाने भारतात परताच ट्विट करून लिहिले की, ‘जगात कुठेही जा; परंतु आपल्या घरी परतण्याची आतुरता काही औरच असते, माझे एवढ्या जल्लोषात स्वागत केल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार, मी मुंबईला परतली आहे.’
![]()
![]()
दरम्यान, प्रियंकाचा विमानतळावरील लुक हटके असा होता. नेहमीच जॅकेट आणि डेनिममध्ये बघावयास मिळणारी प्रियंका मुंबईत येताच समर लुकमध्ये बघावयास मिळाली. कॉटनची पॅण्ट आणि टी शर्ट या अगदी साध्या ड्रेसमध्येही प्रियंकाचे रूप खूलून दिसत होते. विमानतळावरील स्वागतामुळे प्रियंका खूपच भारावून गेल्याचे दिसत होती. शिवाय तिच्यात इंटरनॅशनल स्टारची झलकही स्पष्टपणे बघावयास मिळत होती.
![]()
![]()
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, पीसी भारतात जवळपास दहा दिवस राहणार आहे. त्यानंतर ती हॉलिवूड डेब्यू चित्रपट ‘बेवॉच’च्या प्रमोशनसाठी पुन्हा अमेरिकेत परतणार आहे. ड्वेन जॉन्सन आणि जॅक एफ्रोंनबरोबर ती या चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. असेही बोलले जात आहे की, ‘बेवॉच’ टीम प्रमोशनसाठी भारतही येण्याची शक्यता आहे.
![]()
![]()
प्रियंकाने एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘हे खूप अवघड आहे. कारण मला नाही वाटत की, आम्ही दोन देशांव्यतिरिक्त इतर देशांमध्ये प्रमोशन करण्याचा विचार करीत आहोत, मात्र अद्यापपर्यंत मला पॅरामाउंट पिक्चर्सच्या मार्केटिंग प्लानविषयी कुठलीही माहिती दिली गेली नाही. मात्र माझ्याकडून शक्य होईल तेवढे मी माझ्या देशात या चित्रपटाचे प्रमोशन करणार असल्याचे तिने सांगितले.
![]()
![]()
‘क्वांटिको’च्या दुसºया सेशनची शूटिंग पूर्ण केल्यानंतर प्रियंकाने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंकाला तिच्या परिवारासोबत काहीकाळ वेळ व्यतित करायचा आहे. त्यामुळे असेही बोलले जात आहे की, प्रियंकाकडून एखाद्या ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन करण्याची शक्यता आहे.