SEE PIC : दहा दिवसांच्या सुटीनंतर प्रियंका चोपडा अमेरिकेला रवाना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2017 16:44 IST2017-04-29T11:14:50+5:302017-04-29T16:44:50+5:30

दहा दिवसांपूर्वी भारतात आलेली देसी गर्ल प्रियंका चोपडा पुन्हा अमेरिकेला रवाना झाली आहे. बॉलिवूड प्रोजेक्ट तसेच ‘बेवॉच’चे प्रमोशन करण्यासाठी ...

SEE PIC: Priyanka Chopra leaves for US after ten days off! | SEE PIC : दहा दिवसांच्या सुटीनंतर प्रियंका चोपडा अमेरिकेला रवाना!

SEE PIC : दहा दिवसांच्या सुटीनंतर प्रियंका चोपडा अमेरिकेला रवाना!

ा दिवसांपूर्वी भारतात आलेली देसी गर्ल प्रियंका चोपडा पुन्हा अमेरिकेला रवाना झाली आहे. बॉलिवूड प्रोजेक्ट तसेच ‘बेवॉच’चे प्रमोशन करण्यासाठी ती भारतात आली होती, आता ती पुन्हा एकदा अमेरिकेला रवाना झाली असून, ‘बेवॉच’च्या प्रमोशनसह ती तिच्या ‘क्वांटिको’ या मालिकेची शूटिंग पूर्ण करणार आहे. 



दरम्यान, प्रियंकाचे मुंबई विमानतळावर फोटोज् क्लिक करण्यात आले असून, फोटोंमध्ये तिच्या चेहºयावरील थकवा स्पष्टपणे दिसत आहे. कारण ती मुंबईत परताच तिने अर्धवट राहिलेले सर्व कामे उरकण्याचा धडाका लावला होता. यादरम्यान ती अनेकांना भेटली. शिवाय आपल्या बॉलिवूड मित्रांना एक ग्रॅण्ड पार्टीही दिली. यावेळी तिने तिच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत बनविण्यात आलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाला मिळालेल्या राष्टÑीय पुरस्काराचे सेलिब्रेशनही केले. 



त्याशिवाय ती आगामी काळात दोन बॉलिवूड प्रोजेक्टवर काम करीत असून, त्याबाबतची निर्मात्यांसोबत तिची बोलणी झाल्याचे समजत आहे. दरम्यान, प्रियंकाचा ‘बेवॉच’ हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून, ती अमेरिकेत परतल्यानंतर ‘बेवॉच’ टीमसोबत प्रमोशनमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात ती निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचे तीन ट्रेलर रिलीज करण्यात आले असून, शेवटच्या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा अंदाज बघण्यासारखा आहे. व्हिलेनची भूमिका साकारत असतानाही प्रियंकाचे सौंदर्य मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेला मात देणारे आहे. 



हा चित्रपट २५ मे रोजी रिलीज होणार असून, अभिनेता ड्वेन जॉनसन चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ड्वेनने चित्रपटाचा तिसरा ट्रेलर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रिलीज करताना लिहिले होते की, ‘आमच्या सुपरहिरोज बेवॉचची टीमचे एकच मिशन आहे की, कोणत्याही परिस्थितीत बीचची सुरक्षा करणे’. या चित्रपटात प्रियंका, ड्वेन जॉन्सनव्यतिरिक्त जॅक एफ्रॉन, अलेक्जेंड्रा डेडॅरियो, जॉन बेस प्रमुख भूमिकेत आहेत, तर पामेला एंडरसन आणि डेविड हेसलहाफ पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहेत. 
 

Web Title: SEE PIC: Priyanka Chopra leaves for US after ten days off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.