SEE PIC : ...अखेर करण जोहरच्या जुळ्या मुलांची दिसली झलक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2017 21:17 IST2017-05-07T15:46:14+5:302017-05-07T21:17:11+5:30

दिग्दर्शक करण जोहर याने या वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जाहीर केले होते की, तो सरोगसी पद्धतीने जुळ्या ...

SEE PIC: ... Finally Karan Johar's twin glimpse of twin boys? | SEE PIC : ...अखेर करण जोहरच्या जुळ्या मुलांची दिसली झलक?

SEE PIC : ...अखेर करण जोहरच्या जुळ्या मुलांची दिसली झलक?

ग्दर्शक करण जोहर याने या वर्षाच्या सुरुवातीलाच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे जाहीर केले होते की, तो सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. ज्यांची नावे त्याने रूही आणि यश अशी ठेवली आहेत. करणच्या या घोषणेनंतर त्याच्या जुळ्या मुलांची एक झलक बघण्यासाठी फॅन्समध्ये प्रचंड आतुरता निर्माण झाली होती. यादरम्यान करणच्या मुलांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, परंतु ते फोटोज् करणच्या मुलांचेच आहेत काय? याविषयी मात्र स्पष्टता केलेली नव्हती. असो आता हिंदुस्तान टाइम्सने करणच्या मुलांचे पेंट केलेले फोटोज् प्रसिद्ध केले असून, ते बघून करणच्या चाहत्यांना त्यांची झलक बघावयास मिळाल्याचे समाधान वाटले नसेल तरच नवल. 
  


७ मार्च रोजी जन्मलेल्या या जुळ्या मुलांना २९ मार्च रोजी घरी आणण्यात आले होते. जेव्हा करण मुलांना घेऊन घरी येत होता, तेव्हा त्याचे अनेक फोटोज् मीडियामध्ये आले होते. परंतु त्यामध्ये मुलांचे चेहरे दिसत नसल्याने त्यांची एक झलक बघण्यासाठी फॅन्समध्ये उत्सुकता वाढली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील करणच्या मुलांचे चेहरे दिसत असलेले फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परंतु नंतर हे फोटो फेक असल्याचे समोर आले. 

त्यानंतर करणच्या मुलांसाठी गौरी खान हिने डिझाइन केलेले काही नर्सरीचे फोटोज् समोर आले होते. करणनेच हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. मात्र त्याच्या मुलांचा स्पष्ट चेहरा दिसणारा एकही फोटो अद्यापपर्यंत समोर आला नव्हता. परंतु आता आम्ही असे म्हणू शकतो की, प्रतीक्षा संपली आहे. कारण आज आम्ही तुम्हाला करणच्या रूही आणि यशचे फोटोज् दाखविणार आहोत. 



करणच्या दोन्ही मुलांचे फोटो हिंदुस्तान टाइम्सने कव्हर पेजवर प्रसिद्ध केले आहेत. फोटोमध्ये करण आपल्या मुलांंना कडेवर घेऊन बसलेला दिसत आहे. तर दुसºया फोटोमध्ये दोन्ही मुले सोफ्यावर बसलेली दिसत आहेत. हे दोन्ही फोटोज् सेयान मुखर्जी यांनी पेंट केली असून, त्यामध्ये दोन्ही मुले खूपच गोंडस दिसत आहेत. या फोटोंमुळे करणच्या फॅन्समधील आतुरता कमी झाली असेल असे म्हणायला हरकत नाही. 
फोटो सौजन्य : हिंदुस्तान टाइम्स

Web Title: SEE PIC: ... Finally Karan Johar's twin glimpse of twin boys?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.