SEE PIC : जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे रहस्य तुुम्हाला माहीत आहे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 14:22 IST2017-04-25T08:52:03+5:302017-04-25T14:22:03+5:30

अभिनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिला इंडस्ट्रीमधील मोस्ट स्टायलिश स्टार किड्स म्हणून ओळखले ...

SEE PIC: Do you know the secret of Janhavi Kapoor's beauty? | SEE PIC : जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे रहस्य तुुम्हाला माहीत आहे काय?

SEE PIC : जान्हवी कपूरच्या सौंदर्याचे रहस्य तुुम्हाला माहीत आहे काय?

िनेत्री श्रीदेवी आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिला इंडस्ट्रीमधील मोस्ट स्टायलिश स्टार किड्स म्हणून ओळखले जाते. कारण ती जे काही स्टाइल करतेय त्याची जोरदार चर्चा रंगत असते. मात्र आता जान्हवीच्या या स्टाइलमागचे रहस्य उलगडले आहे. होय, जान्हवीला नुकतेच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या शोरूमबाहेर स्पॉट करण्यात आले आहे. त्याचबरोबर जान्हवीच्या स्टाइलमागचे रहस्यही यानिमित्त उलगडले आहे. 



मनीष मल्होत्राच्या शोरूमबाहेर जेव्हा जान्हवीला कॅमेºयात टिपण्यात आले तेव्हा ती मेकअपविना असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. मात्र अशातही तिचे रूप खुलून दिसत होते. मोकळे केस, ब्लू श्रग, पायात स्नीकर्स परिधान केलेल्या जान्हवीचा लुक खूपच क्यूट दिसत होता. सध्या जान्हवी करण जोहरच्या सांगण्यानुसार अभिनेत्री आलिया भट्ट हिच्याकडून ब्यूटी टिप्स घेत आहे. असे म्हटले जात आहे की, करण जान्हवीला त्याच्या आगामी चित्रपटात लॉन्च करण्याची शक्यता आहे. 



शिवाय असेही बोलले जात आहे की, मराठी ब्लॉकबस्टर ‘सैराट’चा हिंदी रिमेक बनविण्यात येणार असून, त्यामध्ये जान्हवी डेब्यू करण्याची शक्यता आहे. वास्तविक याविषयी अद्यापपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसल्याने, ही अजूनही चर्चाच आहे. पण काहीही असो, जेव्हापासून जान्हवीच्या डेब्यूची चर्चा रंगली तेव्हापासून ती अनेक इव्हेंट आणि पार्ट्यांमध्ये बघावयास मिळत आहे. 



२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. त्यामुळे अनेक बॉलिवूड निर्माते सध्या या चित्रपटाचे राइट्स विकत घेण्यास उत्सुक आहेत. त्यात सर्वांत आघाडीवर करण जोहर याचे नाव असून, असे झाल्यास त्यामध्ये तो जान्हवी कपूरला लॉन्च करण्याची शक्यता आहे. 

Web Title: SEE PIC: Do you know the secret of Janhavi Kapoor's beauty?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.