See Photo: सिनेसृष्टीतील नूतन,दिलिप कुमार, अमिताभ बच्चन यांच्या नाती रूपेरी पडदा नाही तर सोशल मीडियावर ठरतात हिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 15:15 IST2017-02-23T09:45:50+5:302017-02-23T15:15:50+5:30

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, रामानंद सागर, उषा किरण, नुतन यांनी जुन्या जमान्यात आपल्या अभिनयाने भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत ...

See Photo: Nutan, Dilip Kumar, Amitabh Bachchan's son's name is not a silver screen, but hits on social media | See Photo: सिनेसृष्टीतील नूतन,दिलिप कुमार, अमिताभ बच्चन यांच्या नाती रूपेरी पडदा नाही तर सोशल मीडियावर ठरतात हिट

See Photo: सिनेसृष्टीतील नूतन,दिलिप कुमार, अमिताभ बच्चन यांच्या नाती रूपेरी पडदा नाही तर सोशल मीडियावर ठरतात हिट

येष्ठ अभिनेते दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, रामानंद सागर, उषा किरण, नुतन यांनी जुन्या जमान्यात आपल्या अभिनयाने भारतीय सिनेमा इंडस्ट्रीत आपला शिक्कामोर्तब करत आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. एकेकाळी अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणारे या सेलिब्रेटींची तिसरी पिढीही त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत अभिनय करत नाव कमावणार असल्याचे भाकित केले जायचे.मात्र या सेलिब्रेटींचे नाती सध्या त्यांच्या अभिनयाने नाहीतर त्यांच्या सौदर्यांने सोशल मीडियावर हिट ठरताना दिसतायेत.



या यादीत सगळ्यात आधी चर्चेत असते ती रामानंद सागर यांची पणती  साक्षी चोप्रा तीचे एक से बढकर एक फोटो सोशल मीडियावर अपलोड करत चर्चेत असते. साक्षी चोप्राही व्यवसायाने गायिका असून व्हिडीओ ब्लॉगरही आहे.





तर साक्षीनंतर दुस-या नंबर हॉटफोटोमुळे चर्चेत असते ती ओ.पी नय्यर यांची निहारिका रायजादा ही अभिनेत्री आहे.मात्र निहारिका बॉलिवूडमध्ये काही कमाल  दाखवू शकली नाही. बंगाली,गुजरातीमध्ये अभिनय कौशल्य दाखवणारी निहारिका फक्त बोल्ड आणि फोटोशूटमुळे जास्त चर्चेत असते. 






तिस-या क्रमांकावर पब्लिसीटी मिळणारी बिग बी अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली. सध्या नव्याही परदेशात शालेय शिक्षण पूर्ण करतेय.मात्र अधुनमधुन ती लवकरच बॉलिवूड सिनेमात पदारर्पन करणार असल्याच्या चर्चा रंगत असतात. सोशल मीडियावर तिचे स्टनिंग लुक फोटोंमुळे तिने अभिनयात येण्यापूर्वीच आपले अनेक फॉलोवर्स जमवले असल्याचे पाहायला मिळत.मध्यंतरी शाहरूख मुलासह तिचे काही ग्लॅमसर फोटो व्हायरल झाले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यामुळे नेहमी या ना त्या कारणाने नव्या चर्चेत असते. 



मिर्झिया सिनेमातू बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सैयामी खैर ही ज्येष्ठ अभिनेत्री उषा किरण यांची नात आहे.बॉक्स ऑफिसवर सिनेमा हिट ठरला नसला तरीह सैयामी तिच्या सौंदर्यांमुळे रसिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली.सैयामीचा पदार्पणाचा सिनेमा मिर्झियामध्ये सैयामीने रसिकांचे लक्ष खिळवून ठेवल्याचे पाहायला मिळाले. 



शिवाय सिनेमातून रूपेरी पडद्यावर झळकली दिलीपकुमार यांची नात पुतनी सायेशा सेहगल.अजय देवगण दिग्दर्शित ‘शिवाय’मध्ये सायेशा सेहगल हा फ्रेश चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळाला.दिलीप कुमार यांची नात-पुतणीमुळे ती जास्त चर्चेत राहिली.सुमित सेहगल आणि शाहीन बानू यांची ती मुलगी आहे. सायेशाचा पदार्पणाचा शिवाय सिनेमाही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून नावारूपाला येण्यासाठी सायेश सध्या खूप मेहनत घेत आहे. तिला तिची स्वतंत्र ओळख सिनेसृष्टीत बनवायची असल्यामुळे ती तिच्या पध्दतीने मेहनत घेत असल्याचे वेळोवेळी ऐकायला मिळते.




गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांची नात प्रनुतनमध्ये नूतन यांचीच छवी पाहयला मिळते. प्रनूतनही मोहनीश बेहलची मुलगी असून बेहल कुटुंबिय सुरूवातीपासून लाईमलाईटच्या झगमगाटी दुनियेपासून लांब राहणे पसंत करतात. त्यामुळे यांच्याविषयी जास्त माहिती बाहेर येत नसली तरीही प्रनुतनचे फोटो सोशल मीडियावर नेटीझन्सच्या पसंतीस उतरताना दिसतात. 

Web Title: See Photo: Nutan, Dilip Kumar, Amitabh Bachchan's son's name is not a silver screen, but hits on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.