पाहा : ‘शिवाय’चा डायलॉग प्रमो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2016 15:26 IST2016-10-16T15:26:40+5:302016-10-16T15:26:40+5:30
‘शिवाय’चा पहिला डायलॉग प्रमो आऊट झालाय. हा प्रमो पाहून, ‘शिवाय’मध्ये केवळ अॅक्शनच नाही तर तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे अनेक मर्मस्पर्शी क्षणही असतील, याची खात्री तुम्हाला होईल.

पाहा : ‘शिवाय’चा डायलॉग प्रमो
अ य देवगणचे चाहते ‘शिवाय’ची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी लोकांनी डोक्यावर घेतली. आता ‘शिवाय’चा पहिला डायलॉग प्रमो आऊट झालाय. हा प्रमो पाहून, ‘शिवाय’मध्ये केवळ अॅक्शनच नाही तर तुमच्या डोळ्यांच्या कडा ओलावणारे अनेक मर्मस्पर्शी क्षणही असतील, याची खात्री तुम्हाला होईल. २९ सेकंदाच्या या प्रमोमध्ये अजय त्याच्या मुलीसमक्ष एक कबुली देताना दिसतोय. मी तुझ्या आईबद्दल तुला खोटं सांगितलं, असं तो तिला सांगतोय. हा क्षण अतिशय भावूक करणारा आहे. तुम्ही बघा तर!