​पाहा, चिमुकल्या मीशा कपूरचे मॉम मीरा राजपूतसोबतचे पेन्टिंग सेशन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 04:46 AM2017-11-13T04:46:12+5:302017-11-13T10:16:12+5:30

शाहिद कपूरची बेटरहाफ मीरा राजपूत आणि मुलगी मीशा कपूर या दोघीही मायलेकी म्हणजे पापाराझींच्या आवडत्या मायलेकी. या दोघी दिसल्या ...

See, Misha Kapoor's mother, Mira Rajput with a painting session! | ​पाहा, चिमुकल्या मीशा कपूरचे मॉम मीरा राजपूतसोबतचे पेन्टिंग सेशन!

​पाहा, चिमुकल्या मीशा कपूरचे मॉम मीरा राजपूतसोबतचे पेन्टिंग सेशन!

googlenewsNext
हिद कपूरची बेटरहाफ मीरा राजपूत आणि मुलगी मीशा कपूर या दोघीही मायलेकी म्हणजे पापाराझींच्या आवडत्या मायलेकी. या दोघी दिसल्या रे दिसल्या की, पापाराझींचे कॅमेरे सरसावलेच म्हणून समजा. मीशा अलीकडे एक वर्षांची झाली. पण लोकप्रीयतेच्या बाबतीत या चिमुकलीने आपल्या मम्मा-पप्पाला कधीचेच मागे टाकले आहे. मीशा किती लोकप्रीय का आहे, हे तिचे ताजे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.



या फोटोंमध्ये मीशा तिच्या मॉम अर्थात मीरा राजपूतसोबत दिसतेय. केवळ इतकेच नाही तर तिच्या मॉमसोबतच्या फोटोत एक कथा दडलेली आहे. होय, या फोटोंमध्ये लाडकी मिशा वरपासून खालपर्यंत रंगानी माखलेली आहे. चेहºयावर, हातावर, कपड्यांवर सगळीकडे रंग आणि रंग. केवळ मीशाचं नाही तर मीशाची मॉम मीरा ही सुद्धा रंगांनी न्हालेली आहे.  मीशाला कडेवर घेताना, तिच्यासोबत खेळताना मॉमलाही रंगीबेरंगी व्हावे लागले, हे या फोटोंवरून दिसते. आता हा रंग आणि रंगाने माखलेले शरिर याचे कारण काय? तर मीशाचा पेन्टिंग क्लास.



होय, एक वर्षांची मीशा  पेन्टिंग क्लास जायला लागलीयं.  वेगवेगळ्या रंगांसोबत मनसोक्त खेळायचे, वाट्टेल ते रंगवायचे असा हा क्लास. या क्लासमध्ये मीशा किती गुंतलीय, हे तिचा हा फोटो पाहिल्यानंतर लक्षात येईल. मीशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे.





मीशाच्या रंगांत मॉमही न्हाऊन निघालीय. हे अनेक फोटो त्याचा पुरावा आहे. आहे ना, एक सुंदर कथा...

ALSO READ: शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतच्या बॅगची किंमती माहिती आहे तुम्हाला ? जाणून घेण्यासाठी क्लिक करा!

मीरा व शाहिदने मीशाला सामान्य मुलांसारखे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एक स्टार डॉटर म्हणून मीशाच्या सभोवती मीडियाचे अटेंशन असते. पण म्हणून मी तिला दाराआड बंद करून ठेवू इच्छित नाही. मला तिला मुक्त खेळू द्यायचेयं, मनसोक्त लहानपण उपभोगू द्यायचे आहे, असे मीरा अलीकडे म्हणाली होती. मीशाचे हे ताजे फोटो तिच्या स्वछंदी आयुष्याचेच प्रतिक आहे. निरागस मीशा तिचं तितकंचं निरागस लहानपण मस्तपैकी एन्जॉय करतेयं.  

Web Title: See, Misha Kapoor's mother, Mira Rajput with a painting session!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.