SEE BAYWATCH NEW POSTER: प्रियांका चोप्राचा नवा ‘रेड हॉट’ लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:35 IST2017-02-23T07:52:19+5:302017-02-23T16:35:40+5:30

प्रियांका चोप्रा जगातील सर्वात सेक्सी अभिनेत्री आहे यात काही शंका नाही. आपल्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रियांकाने तिचा हॉलीवूड ...

SEE BAYWATCH NEW POSTER: Priyanka Chopra's new 'Red Hot' look | SEE BAYWATCH NEW POSTER: प्रियांका चोप्राचा नवा ‘रेड हॉट’ लूक

SEE BAYWATCH NEW POSTER: प्रियांका चोप्राचा नवा ‘रेड हॉट’ लूक

रियांका चोप्रा जगातील सर्वात सेक्सी अभिनेत्री आहे यात काही शंका नाही. आपल्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रियांकाने तिचा हॉलीवूड डेब्यू सिनेमा ‘बेवॉच’चे नवे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ती ‘रेड हॉट’ दिसतेय.

पोस्टरसोबत तिने ट्विट केले की, ‘थोडेसे वाईट होणे खूप चांगले असू शकते. लवकरच येतेय...!’ नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेल्या ‘बेवॉच’ टीव्ही सिरीजवर आधारित या चित्रपटात प्रियांका नकारात्मक भूमिके त आहे. ‘व्हिक्टोरिया लीड्स’ नावाचे पात्र ती साकारतेय.

विशेष म्हणजे दिग्दर्शक सेठ गॉर्डनने खास प्रियांकासाठी चित्रपटाच्या पटकथेत बदल करून पुरुष खलनायकाचे पात्र तिच्याकरिता खलनायिके चे केले होते. ‘क्वांटिको’ टीव्ही शोमुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तिच्यासाठी हॉलीवूडमध्ये दरवाजे खुले झाले.
 
दोन वेळा ‘पीपल्स चॉईस अवॉर्ड्स’ची मानकरी आपली ‘देसी गर्ल’ या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनच्या लाईफगार्ड जोडगळीला जेरीस आणताना दिसणार  आहे.

उन्हाळ्यात रिलीज होणाऱ्या या चित्रपटात अ‍ॅलेक्झाड्रा डॅडॅरिओ, केली रॉहरबाक, जॉन बेस, इल्फेनेश हेडेरा, याह्या अब्दूल-मॅटिन द्वितीय अशी स्टारकास्ट आहे. चाहत्यांना सुखद धक्का देण्यासाठी ओरिजनल टीव्ही शोमधील डेव्हिड हेसलहॉफ आणि पॅमेला अँडरसन हेदेखील पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

यापूर्वी अमेरिकेतील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा ‘सुपर बॉऊल’च्या निमित्ताने एक विशेष ट्रेलर लाँच करण्यात आले होते. मागच्या अनेक महिन्यांपासून वेळोवेळी ‘बेवॉच’ची नवी पोस्टर्स रिलीज करण्यात येत आहेत. चाहत्यांची उत्सुकता ताणून ठेवण्यासाठी निर्मात्यांनी अशी आगळीवेगळी मार्केटिंग स्ट्रॅटेजी स्वीकारलेली आहे. 

ALSO READ: ​प्रियांका चोप्राला तोडायचा आहे ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनचा ‘दोस्ताना’

Web Title: SEE BAYWATCH NEW POSTER: Priyanka Chopra's new 'Red Hot' look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.