secret affair!! दीपिका पादुकोण टेनिस स्टार नोवाक जोकोविचच्या प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 13:23 IST2017-07-10T07:51:42+5:302017-07-10T13:23:16+5:30

बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोण कुणाला डेट करतेय? असा प्रश्न विचारला तर तुमच्या डोक्यात हमखास रणवीर सिंह याचेच नाव येईल. ...

secret affair !! Deepika Padukone tennis star Novak Djokovic love? | secret affair!! दीपिका पादुकोण टेनिस स्टार नोवाक जोकोविचच्या प्रेमात?

secret affair!! दीपिका पादुकोण टेनिस स्टार नोवाक जोकोविचच्या प्रेमात?

लिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोण कुणाला डेट करतेय? असा प्रश्न विचारला तर तुमच्या डोक्यात हमखास रणवीर सिंह याचेच नाव येईल. पण या प्रश्नाचे रणवीर सिंह असे उत्तर देणार असाल तर तुम्ही चूकलेच म्हणून समजा.  होय, कारण आता या प्रश्नाचे उत्तर रणवीर सिंह नसून नोवाक जोकोविच असे आहे. आश्चर्य वाटले ना! होय, दीपिकाचे नाव आता दिग्गज टेनिस खेळाडू नोवाक जोकोविच याच्यासोबत जोडले जात आहे. खुद्द जोकोविचचे माजी प्रेमिका व सर्बियाची पॉप स्टार नताशा बेकवेलेक हिने हा दावा केला आहे. नोवाक व दीपिकात अफेअर सुरु असल्याचा दावा नताशाने केला आहे.


खरे तर नोवाक विवाहित आहे. पण सध्या नोवाकचे वैवाहिक आयुष्यातही वादळ घोंघावत असल्याचे कळतेय. जोकोविच व त्याची पत्नी येलेना यांच्या नात्यातील तणाव सध्या वाढला आहे. गेल्या १८ महिन्यांपासून दोघांमध्येही वाद होत आहेत. याचे कारण म्हणजे सध्या नोवाकचे नाव अनेक महिलांशी जोडले जात आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे नाव उक्रेनची वकील महिला व्हिक्टोरियासोबत जोडले गेले होते.  डिजे लेडी ली नामक महिलेसोबतही जोकोविचच्या अफेअरची चर्चा रंगली होती. आता जोकोविच व दीपिकाच्या रिलेशनचीच चर्चा आहे. सर्वप्रथम गतवर्षी दीपिका व जोकोविचच्या डिनरडेटची बातमी समोर आली होती. दोघांनीही लॉस एंजिल्समधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर डेट एन्जॉय केली होती. या डिनर डेटसाठी दोघेही एकाच कारमधून रेस्टॉरंटमध्ये गेले होते.



ALSO READ : दीपिका पादुकोणचा हा ‘रॉयल लूक’ तुम्हाला करून देईल परिकथांची आठवण!

दीपिका व रणवीर सिंह हे दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, असे सगळे मानत असताना जोकोविचच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीने केलेला दावा निश्चितपणे धक्कादायक आहे. आता यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. दीपिका आता यावर काय खुलासा करते, ते बघुयात!!

Web Title: secret affair !! Deepika Padukone tennis star Novak Djokovic love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.