विद्याला आली १३ कोटींची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:32 IST2016-01-16T01:18:45+5:302016-02-07T07:32:12+5:30

सो ज्वळ अभिनेत्री विद्या बालनचे साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. कुठलाही समारंभ, अँवॉर्ड फंक्शन यामध्ये विद्या कायम सुंदर, जरीकाठी साड्यांमध्येच ...

The school got 13 crore offers | विद्याला आली १३ कोटींची ऑफर

विद्याला आली १३ कोटींची ऑफर

ज्वळ अभिनेत्री विद्या बालनचे साडीप्रेम तर सर्वश्रुत आहे. कुठलाही समारंभ, अँवॉर्ड फंक्शन यामध्ये विद्या कायम सुंदर, जरीकाठी साड्यांमध्येच दिसते. साडी कॅरी करणे तिला उत्तमरित्या जमते. विद्याच्या या आवडीमुळे आणि साडीमधल्या तिच्या 'टिपीकल इंडीयन लुक' मुळे एका साडीच्या ब्रँडने तिला मॉडेल म्हणून घ्यायचे ठरवले आहे. यासाठी मानधन म्हणून एका वर्षासाठी तिला चक्क १३ कोटी रूपयांची ऑफर देऊ केली आहे. कुठल्याही साडीच्या ब्रँडने इतके मोठे मानधन देण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ब्रँड सोबत काम करायचे कि नाही याबाबत विद्याने अजुन काही ठरवलेले नाही. प्रेग्नंट असल्यामुळे आणखी काही महिने तरी विद्या चित्रपटात काम करणार नसल्याचे समजते.

Web Title: The school got 13 crore offers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.