वेडी म्हणा, चेटकीण म्हणा मला फरक पडत नाही; कंगनाने उघडले तोंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2016 20:07 IST2016-04-28T11:23:53+5:302016-05-03T20:07:41+5:30

हृतिक रोशनसोबतचा वाद आणि एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनचे आरोप यावर कंगना आत्तापर्यंत काहीही बोलली नव्हती. पण आज मंगळवारी अखेर ...

Say crazy, it does not matter to me; Bracelet opened mouth | वेडी म्हणा, चेटकीण म्हणा मला फरक पडत नाही; कंगनाने उघडले तोंड

वेडी म्हणा, चेटकीण म्हणा मला फरक पडत नाही; कंगनाने उघडले तोंड

तिक रोशनसोबतचा वाद आणि एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमनचे आरोप यावर कंगना आत्तापर्यंत काहीही बोलली नव्हती. पण आज मंगळवारी अखेर तिने तोंड उघडलेच. मला कुणी साइको म्हणो, चुडैल म्हणो वा आणखी काही. याने मला काहीही फरक पडत नाही, असे तिने ठणकावून सांगितले. कुठल्याही महिलेची बदनामी करणे सोपे आहेत. एखादी महिला अमाप यशस्वी झालेली दिसली की तिला असे बदनामी करणारे लेबल चिटकवले जातात. माझीही बदनामी करण्याचे, मला कमी लेखण्याचे प्रयत्न झालेत. अर्थातत्याचा किती परिणाम झाला, मला ठाऊक नाही, असे कंगना म्हणाली. हृतिकसोबतचा वाद कोर्टाबाहेर मिटवणार की वादाची पर्वा न करता काम करणार? असा प्रश्न विचारला असता कंगनाने थेट उत्तर देणे टाळले. पण हाय सोसाईटीतील लोक आतून पोकळ असतात. देशात अशाच लोकांची आज चलती आहे. ज्या गोष्टीसाठी मी जबाबदार नाही, त्यासाठी मी स्वत:ला दोष का देऊ. मी चुकले, असे जाणवेल, तेव्हाच मी माफी मागेल, असे कंगना म्हणाले. मी कधीकधी इमोशनल होते. रडते. मला टार्गेट केले जातेयं, असे मला वाटते. पण नंतर सांभाळते. मला स्वत:वर विश्वास ठेवायचा आहे. कारण माझ्याकडे अन्य कुठलाही पर्याय माझ्याकडे नाही. माझे व्यक्तिमत्त्व पूर्णार्थाने बदलण्यासाठी मी अपार मेहनत केली आहे. मी लोकांवर चटकन विश्वास ठेवते. दुसºयांवर विश्वास ठेवण्यातच आयुष्याचे सौंदर्य दडलेले आहे, असे मला वाटते.  चित्रपटांत येण्याआधी माझ्या वडिलांची चूक सिद्ध करणे हा एकच माझा उद्देश होता. कारण माझ्या बॉलिवूडमधील कामाला त्यांचा विरोध होता. पण नंतर मला जाणवले की, मी योग्य आहे, याचा अर्थ समोरचा चुकीचा आहे, असे अजिबात नाही.
अध्ययनने कंगनावर काळी जादू करण्याचा आणि मारहाण करण्याचा आरोप केला आहे. या आरोपांनाही कंगनाने उत्तर दिले. पीरियड ब्लड जेवणात मिळवून द्यायचे, असा आरोप कुणी कसा करू शकतो. ते काही कॉकटेल नाही, जे मी कशातही मिसळून देऊ शकेल. मी भूतकाळाबाबत बोलणार नाही. भूतकाळातील अनेक गोष्टी माझ्यासाठी धक्कादायक होत्या. काही लोक असुरक्षित असतात. म्हणून अशा लोकांसोबत क्रूर वागता येणार नाही. मी हिंदू आहे. विवेकानंदांच्या विचारांनी भारावलेली आहे. माझ्या काही धार्मिक मान्यता आहे. म्हणून कुणी माझ्याशी वाईट वागू शकत नाही, असेही कंगना म्हणाली.
......................................

कंगनावर शेखर सुमनचे  गंभीर आरोप



हृतिक रोशन व कंगना रानोट यांच्यातील कायदेशीर वादात अलीकडे कंगनाचा एक्स बॉयफे्रन्ड अध्ययन सुमन याने उडी घेतली. आता  पाठोपाठ अध्ययनचे वडील शेखर सुमन व आई अल्का सुमन हेही या वादात उतरले आहेत. कंगना माझ्यावर काळी जादू करायची, मला मारहाण करायची, असा आरोप अध्ययनने केला होता. मात्र अध्ययनने केवळ प्रसिद्धी लाटण्यासाठी हे आरोप केले, असे पुढे आले. कदाचित मुलावरील हा ठपका शेखर सुमन व त्याच्या पत्नीला सहन झाला नसावा, म्हणून तेही कंगनाविरूद्ध मैदानात उतरले. एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी कंगनावर अनेक गंभीर आरोप केले. शेखर यांनी सांगितले की, एकेदिवशी माझी पत्नी अल्काने अध्ययनचा ड्रॉवर उघडला असता त्यात काही सुपाºया, नाणी व विचित्र वस्तू सापडल्या. अल्काने मला याची माहिती दिली. माझा मुलगा काळी जादू तर करीत नाही ना, असा संशय तिला आला. दुसºया दिवशी अध्ययन घरी आला, तो सगळे केस कापून. आम्ही त्याला विचारले असता, फॅशन आहे, तुम्हाला कळणार नाही, असे सांगून त्याने वेळ मारून नेली. पण कालांतराने कंगनाच्या सांगण्यावरून तो हे सर्व करतोय, हे आम्हाला कळून चुकले. अध्ययनची आई अल्का सुमन हिनेही यासंदर्भात अनेक खुलासे केले. तिने सांगितले की,  मी अध्ययनबाबत आमच्या पंडितजींना विचारले. यावर अध्ययनवर कुणीतरी काळी जादू केल्याचे त्यांनी आम्हाला सांगितले. कंगना अध्ययनसोबत विचित्र वागायची. त्याला मारायची, शिव्या द्यायची. एकदा कंगनाने अध्ययनला एका खोलीत बंद केले होते. अध्ययनने आम्हाला कॉल केला. तेव्हा तो ओक्साबोक्सी रडत होता. आम्ही कंगनाला कॉल करून अध्ययनला सोडण्याची विनंती केली. पण कंगनाने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यादिवशी मला कंगनाचा प्रचंड राग आला होता, असे अल्का म्हणाल्या. अध्ययन व त्याच्या माता-पित्याच्या या गंभीर आरोपांवर कंगनाने अद्याप कुठलीही सफाई दिलेली नाही.
.....................................................................

​मारहाण व काळी जादू करायची कंगना, एक्स बॉयफ्रेन्डचा धक्कादायक खुलासा
हृतिक रोशन व कंगना रानोट यांच्या वादात रोज नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. आता कंगनाचा एक्स बॉयफ्रेन्ड अध्ययन सुमन याने कंगनाबाबत धक्कादायक खुलासे केले आहे. कदाचित या खुलाशांवर विश्वास ठेवणेही कठीण होईल. पण अध्ययनने कंगनासोबतच्या ब्रेकअपनंतर तब्बन सात वर्षांनी आपले तोंड उघडले आहे. कंगनासोबतच्या रिलेशनशिपदरम्यान त्याने काय काय भोगले, हेच त्याने सांगितले आहे.



मारहाण करायची कंगना
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अध्ययन सुमनने हा आरोप केला. कंगनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना कंगना आल्या दिवशी मला मारहाण करायची, घाणेरड्या शिव्या द्यायची, अपमानास्पद बोलायची, असा आरोप अध्ययनने केला आहे.

काळी जादू करायची कंगना
कंगनाने आपल्यावर काळी जादू केल्याचा आरोपही अध्ययनने  केला आहे. कंगना एकेदिवशी मला एका तांत्रिकाकडे घेऊन गेली होती.अध्ययनने सांगितले की, माझे दिवस चांगले नाही, पूजा करावी लागेल, असे तो तांत्रिक म्हणाला. यानंतर एकदिवस कंगनाने मला घरी बोलवून रात्री १२ वाजता पूजा सुरु केली. कंगनाची गेस्ट रूम संपूर्णपणे काळया कपड्यांनी झाकलेली होती. यानंतर मला काही मंत्रोच्चार करण्यास सांगितले गेले. यानंतर एक दिवस त्या तांत्रिकाने मला रात्री १२ वाजता स्मशानभूमीत जावून काही वस्तू फेकण्यास सांगितले.

कंगना रक्त पाजायची
अध्ययने सांगितले की, मी कंगनाच्या काळ्या जादूने, तिच्या मंत्रतंत्रामुळे मनातून घाबरलो होतो. एकेदिवशी मी कंगनाच्या एक टैरो कार्ड रिडरशी भेटलो. काहीतरी वाईट होणार आहे कारण कुणीतरी तुज्यावर पहाडी जादू केली आहे,असे  त्याने मला सांगितले. त्याचक्षणी मला अचानक क्लिक झाले. माज्या मित्रांमध्ये फक्त कंगना एकटी होती, जी हिमाचलमधून आलेली होती. याबाबत मी आईला सांगितले. माज्या कुटुंबाने मला आमच्या पंडितजींकडे नेले. आमच्या पंडितजींनी मला धक्कादायक गोष्टी सांगितल्या. तू कंगनाच्या हातचे जेवण जेवतोस का, असे त्यांनी मला विचारले. मी हो, म्हटले. यावर पंडितजींनी जे सांगितले ते ऐकून मला धक्काच बसला. कंगना मला जेवणातून तिचे अशुद्ध रक्त पाजत होती, असे पंडितजींनी मला सांगितले.

हृतिकवर होती नजर
कंगनाला ऐनकेनप्रकारे हृतिक हवा होता. त्याच्यावर तिचा डोळा होताच. हृतिकवर ती एकतर्फी प्रेम करायची, असा दावाही अध्ययनने केला. शिवाय यासंबंधित एक घटनाही सांगितली. त्याने सांगितले की, ह्यकाइट्सह्णच्या शूटींगदरम्यान कंगनाची हृतिक व सूजैनसोबत मैत्री झाली झाली होती. ती सतत त्या दोघांसोबत डिनरला जायची. एकदोनदा मीही सोबत गेलो होता. एकदा हृतिकने कंगनाला त्याच्या बर्थडे पार्टीला बोलवले.  मलाही त्याने कॉल केला. मी हृतिकसाठी महागडी फुले आणि शैंपेन घेतली. कंगना व मी पार्टीत बोलत बसलो होतो. त्याचवेळी तिथे हृतिक आला. कंगनाने क्षणात माझ्याकडे दुर्लक्ष करीत, मी आणलेली फुले व शैंपेन घेत हृतिकला विश केले. हे सगळे मी तुझ्यासाठी आणले आहे, असे ती हृतिकला म्हणाली. यानंतर संपूर्ण पार्टीत कंगनाने माझ्याकडे ढुंकूनही बघितले नाही. हृतिकमध्येच ती बिझी झाली.

कंगनाच्या करिअरला धक्का पोहोचवणे, हा हेतू नाही
कंगनासोबतच्या ब्रेकअपनंतर अध्ययन विदेशात गेला. काहीच दिवसांपूर्वी तो परतला आहे. माझा उद्देश कंगनाच्या प्रतीमेला वा तिच्या करिअरला धक्का पोहोचवणे नाही. मात्र ती दुसºया कुणाला लक्ष्य करून स्वत:ला निष्पाप असल्याचे सिद्ध करू शकत नाही, असे अध्ययन म्हणाला. कंगनाने माझ्याबाबत वाईटसाईट बातम्या पेरल्या. त्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले. कंगनाबाबतची ही माझी अखेरची मुलाखत असेल, असेही तो म्हणाला.

Web Title: Say crazy, it does not matter to me; Bracelet opened mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.