​‘सत्यमेव जयते’...आमीर वांद्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 07:14 IST2016-03-11T14:14:00+5:302016-03-11T07:14:00+5:30

‘सत्यमेव जयते’ या शब्दांचा वापर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता आमीर खान व एका मनोरंजन वाहिनीला नोटीस बजावली असून ...

'Satyamev Jayate' ... Amir hangs in love! | ​‘सत्यमेव जयते’...आमीर वांद्यात!

​‘सत्यमेव जयते’...आमीर वांद्यात!

त्यमेव जयते’ या शब्दांचा वापर केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता आमीर खान व एका मनोरंजन वाहिनीला नोटीस बजावली असून २० एप्रिलपर्यंत यावर स्पष्टीकरण मागितले आहे. सामाजिक कार्यकर्ता मनोरंजन राय यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. ‘सत्यमेव जयते’ भारताच्या प्रतिक चिन्हाचा भाग आहे आणि त्यामुळे त्याचा वापर भारतीय राज्य प्रतीक चिन्ह (निषेध व अनुचित वापर) कायदा तसेच भारतीय राज्य प्रतीक चिन्ह (उपयोग व नियमन) कायद्याअंतर्गत उल्लंघन असल्याचा दावा राय यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने आमीरला नोटीस बजावत २० एप्रिलपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले.

Web Title: 'Satyamev Jayate' ... Amir hangs in love!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.