Sara Tendulkar : पार्टीमध्ये सारा तेंडुलकरसोबत 'तो' मुलगा कोण ? चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 17:48 IST2022-11-28T17:45:03+5:302022-11-28T17:48:00+5:30
सारा तेंडुलकरचे दुसऱ्याच मुलासोबत फोटो व्हायरल झाले आहेत. कोण आहे हा मुलगा ?

Sara Tendulkar : पार्टीमध्ये सारा तेंडुलकरसोबत 'तो' मुलगा कोण ? चर्चांना उधाण
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा चेंडुलकर यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली. पण आता साराचे दुसऱ्याच मुलासोबत फोटो व्हायरल झाले. आता या मुलासोबत साराचे नाव जोडले जात आहे. तर शुभमन गिल सारा अली खान ला डेट केल्याचं बोललं जात आहे.
सारा तेंडुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. सतत ती तिचे फोटो आणि अपडेट्स सोशल मीडीयावर शेअर करत असते. सारा सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत असून तिथे तिचा मोठा फ्रेंड सर्कल आहे.अनेक ब्रॅंड्सच्या जाहिरातींमध्ये देखील ती असते.
तर आता हा नवीन मुलगा कोण असा प्रश्न पडला असेल. साराचे एका पार्टीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हा मुलगा आहे 'ओरहान अवात्रामणी' . ओरी हा बॉलिवु्डमधील अनेक स्टारकिड्स ला ओळखतो. पार्टीचे हे फोटो लंडनमधील आहेत. अजय देवगणची मुलगी न्यासा, जान्हवी कपुरचाही तो जवळचा मित्र आहे. तर सारा आणि ओरहान चे अफेअर असल्याच्या अफवा जोरदार सुरु आहेत.