सारा अली खानने शेअर केलेला 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 14:07 IST2020-04-16T14:00:05+5:302020-04-16T14:07:22+5:30
कधी भूमिकेमुळे तर कधी अफेयरमुळे सारा चर्चेत असते.

सारा अली खानने शेअर केलेला 'तो' फोटो होतोय सोशल मीडियावर तूफान व्हायरल
बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच अभिनेत्री सारा अली खान हिने आपले स्थान निर्माण केलं. कधी भूमिकेमुळे तर कधी अफेयरमुळे चर्चेत येणारी सारा आता जुन्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. सारा तिच्या इन्स्टाग्राम फोटोचा कोलाज शेअर केला आहे. एका बाजूला लहानपणीचा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला आताचा फोटो आहे. दोनही फोटोंमध्ये सारा एकच पोज देताना दिसतेय. या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये सारा म्हणते, जी हां, हम बचपन से ही ऐसे हैं।" या फोटोवर वरूण धवनने सारा का सारा अशी कमेंट दिली आहे.
लहानपणीच्या फोटोमध्ये सारा खूपच क्युट दिसते आहे. सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होतो आहे. लहानपणी कुणा वाटले देखील नसले की ही गोंडस मुलगी मोठी होऊन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवेल.
लवकरच सारा अली खान वरूण धवनसोबत ‘कुली नं.१’ च्या रिमेकमध्ये दिसणार आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तर नव्या चित्रपटात वरूण धवन आणि सारा अली खान हे दोन कलाकार दिसतील. तसेच विनोदी कलाकार परेश रावळ, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.