सारा अली खानचा स्वस्त आणि मस्त ड्रेस, या ड्रेसची सगळीकडे होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 17:31 IST2019-05-09T17:30:43+5:302019-05-09T17:31:56+5:30
अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते.

सारा अली खानचा स्वस्त आणि मस्त ड्रेस, या ड्रेसची सगळीकडे होतेय चर्चा
अभिनेत्री सारा अली खानने आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडली आहे. बऱ्याचदा ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मग कधी सिनेमासाठी असेल किंवा तिच्या स्टाईलसाठी. यासोबत तिची फॅशन स्टेटमेंटदेखील फॉलो केली जाते. बॉलिवूडमधील इतर सेलिब्रेटींप्रमाणे सारादेखील डिझायनर व महागडे आऊटफिटमध्ये पहायला मिळते. पण, काही दिवसांपूर्वी तिने जो ड्रेस परिधान केला होता त्याची किंमत ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
सारा सध्या मुंबईतच असून काही दिवसांपूर्वी तिच्या मुंबईतील घराबाहेर मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. यानंतर तिच्या एका गाऊनची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. साराने निळ्या रंगाचा टील गाऊन परिधान केला होता. साराच्या गाऊनवर ऑरेंज रंगाची प्रिंट देखील आहे. या ड्रेससोबतच साराने ऑरेंज रंगाचे वेगळे शूजही घातले होते.
आपल्या या लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी साराने हातात बांगड्या देखील त्याच रंगाच्या घातल्या होत्या. तर आपली हेअरस्टाईल देखील साधी पण आकर्षक अशी केली होती. याच वेळी साराचे हास्य तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत होते. या लूकमध्ये सारा खूपच सुंदर दिसत होती.
साराने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत फक्त २४९९ रुपये एवढी आहे. साराचा हा ड्रेस ग्लोबल देसीचा असून जर सारासारखा लूक करायचा असेल तर तुम्हीही हा ड्रेस खरेदी करू शकता.
सारा अली खानने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत दिसली होती. त्यानंतर ती रणवीर सिंगसोबत सिम्बा चित्रपटात झळकली.
सध्या ती इम्तियाज अलीच्या लव आजकल २चे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मुख्य भूमिकेत अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. त्यानंतर सारा वरुण धवनसोबत कुली नंबर १ सिनेमात देखील दिसेल.